वाहन क्रमांकाची नवी मालिका सुरू होतेय! कोणती ती जाणून घ्या…

124

नवी गाडी घेताना गाडीचा क्रमांक अधिक लक्षवेधी ठरत असतो. प्रादेशिक परिवहन, पनवेल कार्यालयामध्ये दुचाकी मोटार वाहनांच्या नवीन नोंदणीसाठी ‘MH46 CD’ ही नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी कळविले आहे.

नोंदणीसाठी आवाहन

पनवेल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उरण, पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, ज्यांना आपल्या नवीन वाहनासाठी MH46 CD या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 57अ अन्वये आकर्षक/अनाकर्षक नोंदणी क्रमांक राखीव करावयाचे असतील त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.अभय देशपांडे यांनी केले आहे.

( हेही वाचा : कोरोनावर भारी पडणार ‘ही’ निडल फ्री लस! )

लवकरच सुरू होणार नवी मालिका

नवीन नोंदणीसाठी ‘MH46 CD’ ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार असून, जर एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास तरतूदीनुसार नोंदणी क्रमांकासाठी जाहीर लिलाव केला जाईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.