Dahanu येथील समुद्रात नवीन मोठे तेलसाठे सापडले आहेत. त्यामळे भारताला याचा जास्त फायदा होणार आहे. यामुळे तेल आयात करण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. हे साठे पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील Dahanu आणि सिंधुदुर्गातील मालवणजवळ समुद्रात आहेत. डहाणूच्या समुद्रात 5 हजार 338 चौरस किमी आणि तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात 19 हजार 131.72 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. भारताची तेल उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे.
कोकणातील पालघर-डहाणू Dahanu, सिंधुदुर्गमध्ये हे तेल साठे सापडले आहेत. यामुळे भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे येथे उत्खनन करणार आहेत. पालघर, सिंधुदुर्गमधील खोल समुद्रात तब्बल 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे सापडलेले आहेत. अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधीनंतर नवा तेलसाठा सापडला आहे. यापूर्वी 1974 मध्ये मुंबईच्या समुद्रात जवळपास 75 सागरी मैल अंतरावर खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता. मुंबईची ही तेल खाण बॉम्बेहाय नावाने ओळखली जाते. या ठिकाणावरून अद्यापही मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. यानंतर 2017 मध्ये तेल साठे सापडले होते. येथे अमृत’ आणि ‘मुंगा’ या दोन तेल विहिरी खोदण्यात आल्या. आधीच्या दोन तेल साठ्यांच्या तुलनेत सध्या सापडलेले तेल साठे मोठे आहेत. यामुळे तेल उत्पादन चार पटीने वाढणार आहे.
Join Our WhatsApp Community