शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या यादीत ४३ हजार २११ रुग्णांची भर पडली तर ३३ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के नोंदवण्यात आले.
राज्यात मुंबई, ठाणे, पुण्यापाठोपाठ आता पालघर, रायगड आणि नाशिकमध्ये नव्या रुग्णांची नोंद वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदवले. मात्र शुक्रवारी १९ रुग्णांनी आपला जीव गमावला. मुंबईत ९ रुग्णांचा मृत्यू झाला. वसई-विरार परिसरात दोन रुग्णांचा तर ठाणे, पनवेल, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्येही प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्हानिहाय सक्रीय रुग्णांची संख्या
- मुंबई – ८४ हजार ३५२
- ठाणे – ६५ हजार ९७९
- पुणे – ४३ हजार ५६१
- रायगड – १३ हजार ७६९
- पालघर – १० हजार ५४७
- नाशिक – ७ हजार ८२४
(हेही वाचा राज्यात ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचा रॅकोर्ड, पुण्यात रुग्ण वाढीचा विस्फोट)
राज्यात सध्या १९ लाख १० हजार ३६१ जणांना घरी विलगीकरणात तर ९ हजार २८६ रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे.
- राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या – २ लाख ६१ हजार ६५८
- राज्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या – ७१ लाख २४ हजार २७८
- राज्यात आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – ६७ लाख १७ हजार १२५
- राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी – १ लाख ४१ हजार ७५६