-
प्रतिनिधी
मुंबई शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीला नवे रूप देण्यासाठी आणि पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत ‘आयकॉनिक’ इमारती उभारण्याचे धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी बुधवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. या निर्णयामुळे मुंबईच्या सौंदर्यीकरणात भर पडणार असून, शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख आणखी भक्कम होईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “जगातील विविध महानगरे विशिष्ट नगररचना, वैशिष्ट्यपूर्ण इमारतींमुळे प्रसिद्ध आहेत. त्या-त्या शहरांची स्वतंत्र ओळख या इमारतींमुळे तयार झाली आहे. मुंबईतही ब्रिटिशकालीन अनेक इमारती असून, त्या आजही मुंबईच्या ओळखीचा भाग आहेत. आपल्या देशाला समृद्ध वास्तुशैलीचा वारसा लाभला आहे. त्यामुळे मुंबईत अशा जागतिक दर्जाच्या आयकॉनिक इमारती उभारणे आवश्यक आहे.”
(हेही वाचा – विधानसभा उपाध्यक्षपदी Anna Bansode यांची बिनविरोध निवड)
मुंबईचे सौंदर्य वाढविण्यासोबतच अशा इमारतींमुळे पर्यटन वाढण्यास आणि मुंबईची एक आगळीवेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी सांगितले. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे (DCPR) अशा वैशिष्ट्यपूर्ण इमारती बांधताना अडथळे येत आहेत. त्यामुळे वास्तुकलेला चालना देण्यासाठी आणि अशा इमारती उभारण्यास सक्षम वातावरण तयार करण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण आखले आहे.
या धोरणाअंतर्गत, आयकॉनिक इमारतींसाठी स्वतंत्र नियम तयार करून ते मुंबईच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समाविष्ट केले जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील कलम ३७ (१) अन्वये आवश्यक ते बदल करण्यास मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मुंबईच्या शहरी रचनेत नवे पर्व सुरू होणार असून, मुंबईत जागतिक दर्जाच्या नव्या वास्तू निर्माण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे धोरण मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीत नव्या अध्यायाची भर घालेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community