नायर रुग्णालयात लहान मुलांसाठी न्यू रिहॅबिलिटेशन सेंटर, पण मनुष्यबळ खासगी संस्थेमार्फत

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्यावतीने लहान मुलांना एकाच ठिकाणी चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळावी म्हणून न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर तथा अर्ली इंटरर्व्हेशन सेंटर उभारण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी लागणारा डॉक्टर तसेच नर्सेस वगळता अन्य कामगार, कर्मचारी वर्ग हा खासगी संस्थेच्या माध्यमातून भरला जाणार आहे. यापूर्वी नायर रुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉयसह आयाबाई आणि इतर कामगारांची सेवा घेतली जात असतानाच आता अर्ली इंटरर्व्हेशन करताही ४० कामगार,कर्मचारी हे खासगी संस्थेच्या माध्यमातून घेत या विभागाचेही खासगीकरण केले जात आहे.

( हेही वाचा : रेल्वेने घेतला मोठा निर्णय! थर्ड एसी इकोनॉमी कोच बंद होणार; जाणून घ्या तिकीट दरांचे संपूर्ण गणित… )

नायर रुगालयातील अखत्यारित लहान मुलांना एका छताखाली सर्वकष दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी नव्याने उभारण्यात येणारे न्युरो रिहॅबिलिटेशन सेंटर मधील विविध विभागांना दोन वर्षांकरता खासगी संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षांकरता सहायक कर्मचारी उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला. खासगी संस्थांच्या माध्यमातून १० कक्षपरिचर (वॉर्डबॉय), १२ आयाबाई, ६ सफाई कामगार, ४ लिफ्ट चालक, १ दूरध्वनी चालक, ५ सुरक्षा रक्षक आणि १ सुरक्षा अधिकारी व इतर एक याप्रमाणे ४० कामगार,कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जाणार असून यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये सुमित इन्फ्रा सर्व्हिसेस ही कंपनी पात्र ठरली असून दोन वर्षांसाठी या मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध करांसह पावणे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

नायर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार या न्युरो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नायर रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्सेसची सेवा असेल. महापालिकेचे विविध तज्ज्ञ डॉक्टर असतील. परंतु यासाठी लागणारी इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची सेवा ही खासगी संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवण्यासाठी निविदा काढून पात्र संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here