1 ऑक्टोबरपासून बॅंकेचे ‘हे’ नियम बदलणार, वाचा सविस्तर

156

येत्या 1 ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. बॅंकेशी संबंधित व इतर अनेक नियमांत बदल होणार आहेत. हे बदलणारे नियम आपण सविस्तर जाणून घेऊयात.

डेबिट आण क्रेडिट कार्ड नियमांत बदल

1 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम बदलणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे म्हणणे आहे की, टोकनायझेशन सिस्टममध्ये बदल केल्यानंतर, कार्डधारकांचा पेमेंट अनुभव सुधारणार आहे. त्यासोबत डेबिट आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहेत.

ग्राहकांना मिळणार टोकन

नवीन नियमानुसार,रिझर्व्ह बॅंकेने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा संग्रहित करण्यास मनाई केली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याचे नाव टोकन आहे. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल. याची अंमलबजावणी झाल्यानंतर, ऑनलाइन पेमेंटसाठी, थेट कार्ड वापरण्याऐवजी, एक अद्वितीय टोकन वापरावे लागेल.

( हेही वाचा: देशविरोधी कट रचल्याचा आरोप;औरंगाबादमधून पीएफआय संस्थेच्या पदाधिका-यांना अटक )

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणा-यांना 5 हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. आता 1 ऑक्टोबर 2022 पासून या नियमात मोठा बदल होणार आहे. नवीन नियमांनुसार, आता आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

डिमॅट खाते सुरक्षित होणार

नॅशनल स्टाॅक एक्सचेंज 14 जून रोजी एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार, डिमॅट खातेधारकांसाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन न केल्यास, तुम्ही 1 ऑक्टोबर 2022 पासून तुमच्या डीमॅट खात्यात लाॅग इन करु शकणार नाही.

नॅशनल स्टाॅक एक्सचेंज काय म्हणाले?

NSE ने या परिपत्रकात म्हटले आहे की, खातेधारकाला त्याच्या डीमॅट खात्यात लाॅग इन करण्यासाठई ऑथेंटिकेशन घटक म्हणून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. यासोबतच अन्य मार्ग म्हणजे नाॅलेज फॅक्टर असू शकतो. हा पासवर्ड, पिन किंवा कोणताही पाॅजेशन फॅक्टर असू शकतो, जो फक्त वापरकर्त्याला माहीत असतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.