१ एप्रिलपासून काय बदलणार? सामान्यांच्या जीवनावर होणार थेट परिणाम

116

१ एप्रिल २०२३ पासून नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. या बदल झालेल्या नियमांच्या सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.

रस्ते प्रवास महागणार

देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर टोल टॅक्समध्ये वाढ झालेली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलवाढ जाहीर करण्यात आली आहे. आता या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना १८ टक्के अधिक टोल भरावा लागणार आहे. तसेच दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवे आणि NH-9 वरील टोल टॅक्स सुमारे १० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही

नव्या कर प्रणालीनुसार ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर देय लागणार नाही. ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या व्यक्तीने नव्या कर प्रणालीची निवड केल्यास कर भरण्याची गरज लागणार नाही. कारण नव्या कर प्रणालीमध्ये आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८७ अ अंतर्गत उपलब्ध कर सवलत १२ हजार ५०० रुपयांवरून २५ हजारांपर्यंत दुप्पट करण्यात आली आहे.

सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क

१ एप्रिल २०२३ पासून सरकारने सर्व सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक केले आहे. आतापासून ६ अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असणार आहे आणि ४ अंकी हॉलमार्त युनिक आयडेंटिफेकेशन असलेले दागिने विकता येणार नाही.

ऑनलाईन गेममध्ये जिंकलेल्या रकमेवर TDS

ऑनलाईन गेम जिंकला तर कर कपातीसाठी यापूर्वी उपलब्ध असलेली सूट सरकारने बंद केली आहे. आता ऑनलाईन गेममध्ये जिंकलेल्या एकूण रकमेपैकी ३० टक्के टीडीएस भरावा लागणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना फायदा

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा १५ लाखांवरून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. एका खात्यासाठी मासिक उत्पन्न योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा ४.५ लाखांवरून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. जॉईंट अकाऊंटसाठी ही मर्यादा ७.५ लाख रुपयांवरून १५ लाख रूपये करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.