देशभरातील रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन भारत सरकारने मोटार वाहन कायद्यातंर्गत नवे नियम लागू केले आहेत. तुमच्याकडेही कार असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असून १ ऑक्टोबर २०२२ पासून वाहनांच्या टायरच्या डिझाईनमध्ये बदल केला जाणार आहे. पुढील वर्षी १ एप्रिलपासून नवीन टायरसह वाहनांची विक्री केली जाणार आहे. या नव्या नियमांतर्गत यामध्ये C1, C2, C3 श्रेणीतील टायर्सचा समावेश करण्यात आला असून या तिन्ही श्रेणींसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.
( हेही वाचा : Train Boarding Station Rule : आता कोणत्याही स्थानकावरून तुम्हाला पकडता येईल ट्रेन)
१ ऑक्टोबरपासून देशात नवीन डिझाईनचे टायर मिळण्यास सुरूवात होईल. नागरिकांना हे नवीन टायर घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल.
नवे नियम काय आहेत?
बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करताना आपण त्याची quality चेक करतो. चांगल्या रेटिंगच्या वस्तू खरेदी करण्याकडे आपला कल असतो. टायरच्या बाबतीत आजवर असे नव्हते परंतु इथून पुढे मोटार वाहन कायद्याच काही बदल करून सरकारने आता टायर्ससाठी स्टार रेटिंग अनिवार्य केले आहे. नवीन सुविधेअंतर्गत आता ग्राहक टायर खरेदी करण्यापूर्वी त्यासंबंधित संपूर्ण माहिती घेऊ शकतात.
तीन श्रेणींचे टायर
तज्ज्ञांच्या माहितीनुसार टायरचे ३ प्रकार असतील.
C1 – प्रवासी कार श्रेणी
C2 – लहान व्यावसायिक वाहनांमध्ये याचा वापर केला जाईल.
C3 – अवजड व्यावसायिक वाहनांमध्ये या श्रेणींचे टायर वापरले जातील.
टायर का बदलणार?
टायर्ससाठी तीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी रोलिंग रेजिस्टेंस, वेट ग्रिप आणि रोलिंग साउंड एमिशंस हे तीन पॅरामीटर्स आहेत. सर्व टायर कंपन्यांना याचे पालन करावे लागेल आणि BIS मानकांच्या आधारे हे टायर बनवावे लागतील. हे टायर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असतील.
ही तीन मानके लक्षात घेऊन टायर निर्मिती केली जाणार…
- रोलिंग रेजिस्टेंस – रोलिंग रेझिस्टनस म्हणजे कार किंवा वाहन खेचण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा, जर रेजिस्टेंस कमी असले तर टायरला जास्त जोर द्याव लागतो. त्यामुळे टायरमधील रोलिंग रेजिस्टेंसवर काम करण्यात येणार आहे.
- वेट ग्रिप – पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर टायर घसरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे काहीवेळा अपघात होतात. अशा परिस्थितीत आता टायरमधील वेट ग्रिपवर अधिक भर देण्यात आला आहे.
- रोलिंग साउंड एमिशंस – टायर जुना असेल तर वाहन चालवत असताना आवाज येतो त्यामुळे नव्या डिझाइनमध्ये या फिचरवरती सुद्धा काम केले जाणार आहे.