१ डिसेंबरपासून काय बदलणार? सामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम…

98

१ डिसेंबरपासून सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे. येत्या डिसेंबरच्या सुरूवातीपासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्यापासून ते गॅसच्या किमती या संबंधित अनेक कामांचा समावेश होणार आहे.

( हेही वाचा : कोकण टूर सर्किटमधून डिसेंबरमध्ये चार मोफत सहली; येथे करा नोंदणी)

गॅस किंमतींमध्ये होणार बदल

गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस किंमतींमध्ये बदल करतात. अशा परिस्थितीत डिसेंबरमध्ये गॅसचे दर कसे असतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कपात करण्यात आली होती.

पंजाब नॅशनल बॅंकेच्या आणि SBI खातेदारांसाठी विशेष अपडेट

जर तुम्ही पंजाब नॅशनल बॅंक अथवा SBI चे खातेदार असाल तर तुम्हाला एटीएममधून पैसे काढताना तुमचा मोबाईल घेऊन जाणे आवश्यक आहे कारण तुम्हाला पैसे काढण्यासाठी मोबाईलवर येणारा ओटीपी समाविष्ट करावा लागेल.

गाड्यांच्या वेळेत बदल होणार

डिसेंबर महिन्यात थंडी आणि धुक्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे, भारतीय रेल्वेने डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी-मार्च २०२३ या तीन महिन्यांसाठी ५० हून अधिक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासा.

सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल

दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलियम कंपन्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गॅसच्या किमतीत बदल करत असल्याची माहिती समोर आली आहे.

डिजिटल रुपया सेवेत येणार

डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुद्धा काही ठिकाणी १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.