इलेक्ट्रिक वाहनांसाठी कराव्या लागणार नव्या चाचण्या, दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

150

सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांनी पेट घेतल्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत अवजड उद्योग मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षा चाचणीची एक नवी यादी जाहीर केली आहे.

त्यामुळे ईव्ही प्रमोशन स्कीम अंतर्गत सबसिडी मिळवणा-या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांना एप्रिल 2023 पासून या चाचण्या करणे बंधनकारक असणार आहे.

(हेही वाचाः कोरोनाचा शाळांनाही बसला फटका, 20 हजारांहून अधिक शाळांना लागले कुलूप)

अवजड उद्योग मंत्रालयाचा निर्णय

नव्या चाचण्यांनुसार, बॅटरी पॅक,बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि सेल अशा तीन स्तरांवर बॅटरीची तपासणी करणे आवश्यक आहे. या चाचण्या इलेक्ट्रिक वाहनांतील बॅटरीपासून लोकांना संभवणारा धोका कमी करेल. देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांनी पेट घेतल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी आहेत नवी मानके

मानवी सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चाचण्या करण्यात येतात. या चाचण्या पीएलआय स्कीम अंतर्गत मिळणारे विविध लाभ मिळवण्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून बंधनकारक असल्याचे अवजड मंत्रालयाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. नव्या तरतुदींनुसार, सेल स्तरावर 6,बीएमएस स्तरावर 10 आणि बॅटरी पॅक स्तरावर 6 चाचण्या करणे अनिवार्य असणार आहे. या नव्या मानकांचे इलेक्ट्रिक कंपन्यांकडूनही स्वागत करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.