मध्य रेल्वेमध्ये नव्याने सुरु झालेल्या 12 एसी लोकलचे वेळापत्रक

139

मुंबईतील एसी लोकल गाड्यांच्या भाडे दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण असताना त्यात आणखी भर पडणारी बातमी समोर आली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाड्या सीएसएमटी- कल्याण- टिटवाळा- बदलापूर या मुख्य मार्गावर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या वाढवलेल्या अशी लोकलचे वेळापत्रकही रेल्वेने जाहीर केले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयानंतर मुख्य मार्गावर एसी लोकलच्या 12 फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे मुंबईतील रेल्वे मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या 44 वरून 56 होणार आहे. इतकेच नाही तर शनिवार, १४ मे २०२२ पासून १२ एसी लोकल या रुळांवर धावणार आहेत. हार्बर मार्गावरील एसी लोकल मेन लाईनवर आणि मेन लाईनच्या नॉन एसी सेवा हार्बर लाईनवर हलवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे, म्हणजेच गाड्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही.

(हेही वाचा धक्कादायक! भायखळ्याच्या सेंट अँड्र्यूज शाळेकडून उन्हाळी सुटीत ख्रिस्ती धर्मप्रसार)

एसी लोकलच्या भाड्यात आधीच कपात केली 

रेल्वेने ५ मे रोजी भाड्यात कपात केल्यानंतर एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. संख्या वाढल्याने एसी लोकलची सेवा वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर सध्या १८१० लोकल धावतात. त्यापैकी ८९४ सेवा मेन लाईनवर, ६१४ हार्बरवर, २६२ ट्रान्स हार्बरवर आणि ४० सेवा चौथ्या कॉरिडॉरवर (उरण लाईन) धावतात. सध्या मध्य रेल्वेकडे एसी लोकलचे ५ रेक असून त्यात ४ मधून सेवा चालवली जात आहे, तर एकाची दुरूस्ती सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.