New Toll Policy 2025 : ३००० रुपये भरा; वर्षभर टोलमुक्त प्रवास करा

New Toll Policy 2025 : पास राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग, तसेच राज्य द्रूतगती महामार्गावर लागू होणार आहेत.

221

गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू असलेल्या देशातील टोल नाक्यांच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यात आला आहे. (lines on toll plaza) प्रस्तावित नवीन टोल धोरणामुळे टोल शुल्कात सरासरी ५० टक्के सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच लोकांना ३ हजार रुपये वार्षिक पासची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे पास राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि द्रुतगती महामार्ग (Expressway), तसेच राज्य द्रूतगती महामार्गावर (State Expressway) लागू होणार आहेत. (New Toll Policy 2025)

(हेही वाचा – Nashik Satpir Dargah : नाशिकचा अनधिकृत सातपीर दर्गा हटवला ; पाहा Photo)

नवीन टोल धोरण तयार करण्याशी संबंधित सध्या फक्त मासिक पास दिले जातात. त्यानुसार, स्थानिक लोकांना टोल प्लाझा ओलांडण्यात दिलासा दिला जातो. नवीन धोरणात, ३ हजार रुपयांचा वार्षिक पास मिळवून एक कार वर्षभर अमर्यादित किलोमीटर प्रवास करू शकते. तसेच कोणत्याही एक्सप्रेसवे किंवा महामार्गावर त्याला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

ही योजना लागू करण्यासाठी वेगळा पास घेण्याची आवश्यकता नाही. ही ३००० रुपये फी फक्त फास्टॅग खात्याद्वारे भरता येणार आहे. नवीन टोल धोरण टोल प्लाझावरील व्यवस्थेऐवजी प्रति किलोमीटर निश्चित शुल्कावर आधारित असेल. साधारणपणे एका गाडीला प्रत्येक शंभर किलोमीटरसाठी ५० रुपये टोल शुल्क द्यावे लागेल. (New Toll Policy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.