सध्या वाहनांचा टोल जमा करण्यासाठी फास्ट टॅग तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. परंतु यामध्ये लवकरच बदल करण्यात येणार असून देशात नवी प्रणाली अंमलात येणार आहे. केंद्र सरकार लवकरच नवीन टोल सिस्टिम आणणार आहे. केंद्र सरकारकडून कॅमेरावर आधारित टोल जमा करण्याच्या पद्धतीचा विचार सुरू आहे. या योजनेअंतर्गत कॅमेरे वाहनाचा क्रमांक स्कॅन करतील आणि त्यानंतर संबंधित वाहनधारकाच्या खात्यातून पैसे कापले जाणार आहेत. यापूर्वी अनेकदा रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची माहिती दिली आहे.
( हेही वाचा : नववर्षात रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळणार खास सुविधा! या स्थानकांवर सुरू होणार ‘ममता कक्ष’)
हे कॅमेरे ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर’ म्हणून ओळखले जातील. सध्या भारतातील ९७ टक्के टोल प्लाझावर फास्टटॅगचा वापर केला जातो. परंतु फास्ट टॅग सुरू झाल्यानंतर सुद्धा टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. टोल प्लाझावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) सेट केल्यावर ट्रॅफिक होणार नाही आणि नागरिकांचा वेळही वाचेल अशी शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) तंत्रज्ञान कसे काम करेल?
देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरून टोल प्लाझा हटवण्यात येतील आणि त्याऐवजी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर इन्स्टॉल केले जातील. या सिस्टिमवर नंबर प्लेटची नोंद करण्यात येईल आणि व्यक्तीच्या बॅंक अकाऊंटमधून पैसे भरले जातील.
या तंत्रज्ञानातील सर्व मोठी अडचण म्हणजे कॅमेऱ्यांमध्ये केवळ २०१९ नंतर बनवण्यात आलेल्या गाड्यांचेच नंबर कॅप्चर केले जातील. त्यामुळे टोल बूथसंदर्भातील कायदेशीर तरतुदी पूर्ण करण्यासाठी ज्या वाहनांवर अधिकृत नंबर प्लेट नाही त्यांना विशिष्ट कालावधीच्या आधी अधिकृत नंबर प्लेटची व्यवस्था करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community