जगभरातली कोट्यावधी माणसे संभाषणासाठी दररोज व्हॉट्सअॅपचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर लाँच केले होते. या फिचरमुळे एकाच खात्यातून चार वेगवेगळ्या डिव्हाईसवरून लॉग इन करता येणार आहे. याच्या पाठापाठो यूजर्सना उपयोगी पडणारे आणखी एक फीचर लवकरच येण्याची शक्यता आहे. (WhatsApp Features 2023)
नक्की फीचर आहे काय? (WhatsApp Features 2023)
२.२४ अब्ज लोक नियमितपणे व्हॉट्सअॅपचा वापर करतात. या यूजर्सच्या सुरक्षिततेसाठी कंपनी सतत काही ना काही नवीन फीचर लाँच करत असते. लवकरच आगामी येणारे हे फीचर सगळ्यांच्या उपयोगात येणार आहे. काही व्यक्तींसोबतचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आता संपूर्ण अॅपला लॉक लावण्याची गरज नाही. जे चॅट लपवायचे आहेत, फक्त तेच लपवणे या फीचरमुळे शक्य होणार आहे. इतकेच नाही तर ज्या चॅटला लॉक लावण्यात आले आहे, त्या चॅट्समधील फोटो किंवा व्हिडीओ फोनच्या गॅलरीमध्ये ऑटोमॅटिक डाउनलोड होणार नसल्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – स्वस्तात फिरा नेपाळ! IRCTC च्या पॅकेजमध्ये मिळणार अनेक सवलती)
WaBetaInfoने ट्टिवरवर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यात या नव्या फीचरची एक झलक पाहता येत आहे. चॅट लॉक करण्यासाठी ..
– ज्या व्यक्तीसोबतचे चॅट लॉक करायचे आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट प्रोफाइलमध्ये जा
– तिथे खाली स्कोल केल्यावर ‘चॅट लॉक’ हा पर्याय दिसेल
– ‘लॉक दिस चॅट विथ फिंगरप्रिंट’ हा पर्याय निवडा
– फिंगरप्रिंट व्हेरीफाय करा
– त्यानंतर त्या व्यक्तीसोबतचे चॅट लॉक होईल
📝 WhatsApp beta for Android 2.23.8.2: what's new?
WhatsApp is working on a feature that allows users to lock chats and keep them hidden, available in a future update of the app!https://t.co/Ki7dl9PDp7 pic.twitter.com/GrKyWmUWoh
— WABetaInfo (@WABetaInfo) April 1, 2023
तुम्हाला वापरता येणार? (WhatsApp Features 2023)
व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर कोणालाही वापरता येणार नाही. फक्त काही निवडक यूजर्सना या फीचरचा वापर करता येणार आहे. WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार या खास फीचरचा वापर येत्या काही आठवड्यात सर्व यूजर्सना करता येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community