नवीन वर्षातील रेल्वेचा पहिला विशेष ब्लॉक! कुठे असणार जाणून घ्या…

122

मध्य रेल्वे ठाणे – दिवा 5 व्या आणि 6 व्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळाना जोडण्यासाठी कळवा आणि दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक रविवार, 2.1.2022 च्या रात्री 02.00 वाजल्यापासून ते सोमवार, 3.1.2022  च्या पहाटे 02.00 वाजेपर्यंत (2am to 2am) अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर घेतला जाईल. यामुळे गाड्याच्या धावण्याची पद्धत खालीलप्रमाणे असेल:

उपनगरीय सेवा : 

  • 1.1.2021 रोजी 23.52 वाजलेपासून ते 2.1.2022 रोजी 23.52 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवले जातील आणि गंतव्य स्थानकावर निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंडहून येथून 2.1.2022 रोजी 05.05 वाजलेपासून ते 3.1.2022 रोजी 01.15 वाजेपर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानकावर 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
  • ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
  • कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
  • प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका परिवहन उपक्रमाशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था देखील केली आहे.
  • संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथून सुटणाऱ्या /टर्मिनेट होणारे लोकल सेवा उपलब्ध नसतील.
  • ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकाच्या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.
  • “ब्लॉकनंतर अप आणि डाऊन स्लो मार्गावरील सेवा नव्याने टाकलेल्या अप आणि डाऊन स्लो मार्गावरून रेल्वे फ्लाय ओव्हरद्वारे धावतील आणि मुंब्रा स्टेशनच्या नवीन फलाटांवर थांबतील.”
  • उपनगरीय सेवा 3.1.2022 (सोमवार) रोजी नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावतील

(हेही वाचा राज्यात सरकार स्थापनेसाठी मोदींनीही दिलेली ऑफर! शरद पवारांचा गौप्यस्फोट)

मेल/एक्सप्रेस सेवा :

रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या –

1.1.2022 (शनिवार) रोजी प्रवास सुरू होणाऱ्या

  • 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस
  • 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
  • 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या :

2.1.2022 (रविवार) रोजी प्रवास सुरू होणाऱ्या

  • 11007 / 11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • 12071 / 12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 12109 /12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस
  • 11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
  • 12123 /12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
  • 12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस
  • 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
  • 11139 मुंबई-गदग एक्सप्रेस
  • 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या :

3.1.2022 (सोमवार) रोजी प्रवास सुरू होणाऱ्या

  • 11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
  • 11140 गदग-मुंबई एक्सप्रेस

एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन

  • 1.1.2022 रोजी सुटणारी 17317 हुबली-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल आणि 2.1.2022 सुटणारी 17318 दादर-हुबली एक्सप्रेस दादर ऐवजी पुण्याहून निघेल.
  • 1.1.2022 रोजी सुटणारी 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल आणि 2.1.2022 सुटणारी 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबई ऐवजी पुणेहून सुटेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.