नवीन वर्षांत ‘या’ एक्सप्रेसचे वेळापत्रक आणि गाडीची संरचना बदलणार

नवीन वर्षात रेल्वे प्रशासन नांदेड-पुणे एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. तसेच गाडीची संरचनाही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

12730/12729 नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस 3.1.2022 पासून पुढील सुधारित वेळेसह पुण्याऐवजी हडपसर येथे संपेल आणि हडपसर येथूनच निघेल.

02730 गाडीला जालना येथून 2.1.2022 रोजी 11.00 वाजता रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

सुधारित सेवा : 12730 एक्सप्रेस 2.1.2022 पासून नांदेडहून 18.30 वाजता (21.30 ऐवजी) निघेल आणि हडपसरला दुसर्या दिवशी 06.55 वाजता पोहोचेल (पुणे येथे दुसऱ्या दिवशी 09.40 ऐवजी).

12729 एक्सप्रेस 3.1.2022 पासून हडपसरहून 22.00 वाजता (पुण्यापासून 22.00 ऐवजी) सुटेल आणि सध्याच्याच वेळेप्रमाणे दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता नांदेडला पोहोचेल.

(हेही वाचा अजित पवार पहाटेच्या शपथविधीला जाणार, यातही होती पारदर्शकता…पुस्तकात होईल स्पष्ट)

सुधारित रचना : एक प्रथम श्रेणी वातानुकुलीत, दोन द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, चार तृतीय श्रेणी वातानुकुलीत, एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत इकॉनॉमी, सहा स्लीपर क्लास, चार सेकंड क्लास आसन आणि दोन जनरेटर व्हॅन.

आरक्षण : प्रथम श्रेणी वातानुकुलीत आणि एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत इकॉनॉमी क्लाससाठी बुकिंग 30.12.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल. संरचना बदलल्यामुळे आधीच बुक केलेले प्रवाशाना पुन्हा वाटप केले जातील.

या ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून या ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here