- विषेश प्रतिनिधी, मुंबई
तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कमला मिल मधील एका इमारतीला आग लागून पब मधील तरुण-तरुणींचा गुदमरून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू आणि १९ ते २१ जण जखमी झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याचे काळजी घेत महापालिकेने वरळी, लोअर परेल आणि महालक्ष्मी भागातील महत्त्वाच्या पब, रेस्टोबार, रेस्टॉरंट यांची तपासणी करून अनावश्यक तेल आणि सिलेंडर साठा जप्त केला. तसेच नियमांचे उल्लंघन केलेल्या सहा रेस्टॉरंट वर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. (New Year 2025)
नुतन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना कोणतीही अनुचित दुर्घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून मुंबई महापालिका परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापलिका जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांना निर्देश देत तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणी करण्यात येणाऱ्या संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, तसेच गरज पडल्यास त्या आस्थापनचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याबाबत आदेश होते. (New Year 2025)
(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड-तोड कामगिरी, आयसीसी पुरस्कारासाठीही नामांकन)
त्यानुसार, महापलिका जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात लोक एकत्र येण्याची शक्यता आहे, अशा सर्व पब, रेस्टोबार, रेस्टॉरंट आदी आस्थापना तपासण्याची मोहीम हाती घेतली होती. विभाग पातळीवर ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्याकरिता २ पथकांची नियुक्ती केली होती. यात विभाग अग्निशमन अनुपालन विशेष पथक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, परिमंडळ अग्निशमन अधिकारी, सर्व विभागीय अग्निशमन अनुपालन अधिकारी, सहाय्यक अभियंता इमारत व कारखाने विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी, परवाना विभागाचे वरिष्ठ निरीक्षक आदींचा समावेश आहे. (New Year 2025)
त्यानुसार २७ डिसेंबर २०२४ रात्री सुरू झालेल्या मोहिमेत आता पर्यंत एकूण २९ रेस्टोबार आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत उल्लंघन आढळलेल्या ६ रेस्टोबार आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अधिनियम १८८८ च्या कलम ३९४ अंतर्गत नोटीस जारी करण्यात आल्या असून ४ आस्थापनांमध्ये जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ९ व्यावसायिक प्रकारचे एल.पी.जी (LPG) गॅस सिलिंडर तसेच, आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवलेला खाद्य तेलसाठा (१२०० लिटर) जप्त करण्यात आला आहे. ही मोहिम जास्तीत यशस्वी करण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन तसेच उत्पादन शुल्क विभाग यांच्याशी समन्वय साधण्यात येत असून सहाय्यक आयुक्त अंडे या स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. (New Year 2025)
(हेही वाचा – Suresh Dhas Apologies Prajakta Mali आमदार सुरेश धस यांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी)
डिसेंबर २०१७ मध्ये कमला मिल कंपाउंडमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या पार्टीमध्ये जमलेले तरुण-तरुणी येथे लागलेल्या आगीमध्ये अडकले गेले होते. या दुर्घटनेत १४ तरुण-तरुणी मृत्यू पावल्या होत्या. तर १९ ते २१ जण जखमी झाले होते. तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा नव वर्षाचे स्वागत करायला जाताना अशी कोणतीही दुर्घटना घडू नयेत यासाठी उपायुक्त आणि सहायक आयुक्त हे डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. (New Year 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community