१ जानेवारी २०२३ या नववर्षात काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांचा सामान्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहे. नवीन वर्षात नव्याने लागू होणाऱ्या नियमांचा सामान्य नागरिकांच्या बजेटवर काय परिणाम होणार कोणते बदल होणार जाणून घेऊया…
( हेही वाचा : अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला पंत? ऋषभची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला… )
नव्या वर्षात काय बदलणार?
पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर वाढणार
नव्या वर्षाच्या सुरुवातीला पोस्ट ऑफिसच्या योजनांचे व्याजदर वाढणार आहे. सरकारने पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. NSC, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र या विविध योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ २० ते ११० बेसिस पॉइंट्सपर्यंत करण्यात आली आहे. नवे व्याज १ जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.
वाहने महाग होणार
जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर वाहनांच्या दरात १ जानेवारी २०२३ पासून वाढ होणार आहे. मारूती, किया, टाटा मोटर्स, मर्सिडीज, ह्युंदाई, ऑडी, रेनॉल्ट आणि एमजी मोटर्स या कंपन्या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करणार आहेत.
क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
२०२३ मध्ये क्रेडिट कार्डाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे रिवार्ड पॉईंट्स हे नवीन वर्षांआधी रिडेम करून घ्या. १ जानेवारीपासून काही बॅंकांच्या रिवॉर्ड पॉईंटमध्येही बदल होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्येच रिवॉर्ड पॉईंट रिडेम करा.
बॅंक लॉकरचे नियम बदलणार
१ जानेवारीपासून बॅंक लॉकरच्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहे. नवे नियम लागू झाल्यावर बॅंकेच्या लॉकरमधील वस्तू हरवल्यास बॅंक त्याची जबाबदारी घेणार आहे. लॉकरशी संबंधित कोणताही निर्णय घेताना बॅंकेला ग्राहकांना माहिती द्यावी लागणार आहे.
पॅन-आधार लिंक
जर तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल तर त्वरीत करून घ्या. आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत एप्रिलपर्यंत वाढवली आहे. परंतु तुम्ही वेळेत लिंक प्रक्रिया पूर्ण केल्यास बॅंकिंग व्यवहारात अडचणी येऊ शकतात.
विमा प्रिमियम महागणार?
नववर्षात २०२३ मध्ये विमा प्रिमियम ( Insurance Premium ) महागण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांकडून नव्या वर्षात नवीन नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.
CNG आणि PNG किंमतींमध्ये बदल
नवीन वर्षात सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या १ तारखेला नवीन किंमती जारी केल्या जातात. नव्या वर्षात पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणते नवे दर जारी केले जातात याकडे सामन्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Join Our WhatsApp Community