New Year: थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांसाठी पोलीस अलर्ट मोडवर, समु्द्रकिनाऱ्यांवर कडक पहारा; कशी असेल सुरक्षा व्यवस्था? वाचा सविस्तर…

130
New Year: थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांसाठी पोलीस अलर्ट मोडवर, समु्द्रकिनाऱ्यांवर कडक पहारा; कशी असेल सुरक्षा व्यवस्था? वाचा सविस्तर...
New Year: थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांसाठी पोलीस अलर्ट मोडवर, समु्द्रकिनाऱ्यांवर कडक पहारा; कशी असेल सुरक्षा व्यवस्था? वाचा सविस्तर...

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी तयारी सुरू असली, तरीही पोलीसही सतर्क झाले आहेत. ठिकठिकाणी मुंबई पोलिसांची नागरिकांच्या संरक्षणासाठी विशेष गस्त घालण्याची तयारी सुरू आहे तसेच समुद्रमार्गे शत्रुचा प्रवेश होऊ नये यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉटेल, पब रिसॉर्टस, मॉल याबरोबरच चौपाट्यांवर नववर्षाचे स्वागत करायला येणाऱ्यांची संख्या जास्त असते. चौपाट्या, समुद्रकिनारे, हॉटेल्स येथील वाढती गर्दी कशी टाळता येईल याकडेही पोलिसांचे लक्ष असणार आहे.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनुचित प्रकार घडू नये, गर्दीचा फायदा घेऊन कोणीही समुद्रामार्गे शहरात घुसखोरीचा प्रयत्न करू नये, यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आहेत. ३१ डिसेंबरला अनेक तरुण-तरुणी, मित्र-मैत्रिणी समुद्रकिनाऱ्यांवर धम्माल मस्ती करण्यासाठी आवर्जून जातात. त्यामुळे या ठिकाणी विशेष पहारा देण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.

(हेही वाचा – Mann Ki Baat : नवीन वर्षातही आपल्याला उत्साह आणि वेग कायम ठेवायचा आहे – पंतप्रधान मोदी)

कडक सागरी सुरक्षा व्यवस्था
जमिनीवरील सुरक्षा व्यवस्थेप्रमाणेच सागरी सुरक्षादेखील कडक करण्यात आली आहे. १६ बोटींच्या माध्यमातून मुंबईच्या सागरी किनाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, जुहू, मढ-मार्वे, अक्सा, वांद्रे…अशा हमखास गर्दी होणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर बोटीतून नजर ठेवली जाईल.

समुद्रकिनाऱ्यावरील लॅंडिंग पॉईंटच्या दिशेने विशेष नाकाबंदी असेल. कोणीही आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाताना दिसल्यास, त्यांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल. प्रत्येक बोटीवर १ अधिकारी आणि ८ कर्मचारी असे पथक असेल. १६ बोटींव्यतिरिक्त २ बोटी राखीव असतील.

पश्चिम रेल्वेवर ८ विशेष लोकल धावणार
पश्चिम रेल्वेवर रविवार आणि सोमवारी मध्यरात्री ८ विशेष लोकल धावणार आहेत. चर्चगेट स्थानकातून मध्यरात्री १.१५ वाजता पहिली, तर दुसरी लोकल रात्री २ वाजता चर्चगेटहून सुटणार आहे. तिसरी लोकल रात्री २.३० वाजता, तर चौथी लोकल पहाटे ३.२५ वाजता चर्चगेटहून विरारसाठी सुटणार आहे. विरारहून १२.१५ वाजता ते ३.०५ वाजण्याच्या सुमारास चार लोकल सोडल्या जाणार. पश्चिम रेल्वेवर उद्या रविवारी १७ लोकल रद्द करून त्या जागी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत.

(हेही वाचा – Ration Shopkeeper Strike : राज्यभरातील रेशन दुकानदारांचा १ जानेवारीपासून बेमुदत संप)

ऑपरेशन ऑल आऊट
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले जात आहे. संशयास्पदरित्या वावरणे, ड्रग्ज पेडलर्स, नियमबाह्य वाहन चालवणारे अशांविरोधात कारवाई केली जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.