तुर्कीनंतर न्यूझीलंडमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप! त्सुनामीचा इशारा

न्यूझीलंडमध्ये गुरूवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनाटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGC) ही संस्था जगातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवते. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटांवर ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची खोली जवळपास १० किमी इतकी होती.

( हेही वाचा : Maharashtra Political Crisis Supreme Court: …म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले – कपिल सिब्बल)

त्सुनामीचा इशारा

युनाटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेने न्यूझीलंडला त्सुनामीचा इशारा दिला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर आत होता. भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंप समुद्राच्या भागात झाल्याने भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटरच्या त्रिज्येत त्सुनामी येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसा इशारा न्यूझीलंड प्रशासनाला देण्यात आला आहे.

न्यूझीलंड हा देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये दरवर्षी भूकंप होतात. गुरुवारी सकाळी आलेल्या भूकंपात न्यूझीलंडमध्ये किती नुकसान झाले आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here