जे.जे. रुग्णालयात साजरा झाला ‘नवजात शिशू सप्ताह’

114

सर ज.जी.समूह रुग्णालयातील परिचारीका महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नवजात शिशू सप्ताह १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या दरम्यान साजरा करण्यात आला. नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची याविषयी जनजागृती करणे हा या सप्ताहामागील मुख्य उद्देश आहे. नवजात बालक मृत्यूदर कसा कमी करता येईल याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन परिचारीका महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी, सिस्टर इन्चार्ज यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.

( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या प्रयत्नांना यश! कंत्राटी भरतीला शासनाची स्थगिती)

यामध्ये प्रामुख्याने व्याख्यान, पोस्टर, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य व आरोग्य शिक्षण अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नवजात बाळाचे आरोग्य कसे सुदृढ ठेवता येईल व त्यांचा मृत्यूदर कसा कमी होईल, तसेच हा सप्ताह का साजरा केला जातो याविषयी प्राचार्य डॉ. अपर्णा संख्ये यांनी व्याख्यान दिले. सुनीता चांदुरकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थी कल्याण विभागाच्या हेमलता गजबे, विद्यार्थी प्रतिनिधी उमेश देवकाते, आदित्य सोमकोवर, प्रियंका टेकाळे तसेच नवजात शिशू सप्ताह यशस्वी करण्याकरता सर्व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.