मुंबईतील शहरातील मुंबई सेंट्रल-ग्रॅंटरोड येथील बेलासिस रोडवरील बीआयटी चाळींमधील भूमीगत पाण्याची टाकी जुनी व जीर्ण झालेली असून या टाकीच्या ठिकाणी आता नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या पाण्याच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
भूमिगत पाण्याच्या टाक्या १०० वर्षे जुन्या
बेलासीस रोड येथील बीआयटी क्रमांक १ ते १९ या इमारती महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या मालकीच्या असून या ठिकाणी भूमिगत संक्शन टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालामध्ये ही भूमिगत पाण्याच्या टाक्या या १०० वर्षे जुन्या असल्याने या संक्शन टाकीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भूमिगत संक्शन टाकीचे बांधकाम, आतून गिलावा व रंगकाम तसेच विद्युत कामांसह प्लंबिंगच्या कामांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एस.पी. इंजिनिअर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यासाठी सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या टाकीचे बांधकाम करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या कंत्राटदाराने पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील सीएफओ यार्डातील ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम केले आहे. त्यामुळे भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचा यापूर्वीचा कोणताही अनूभव नाही. तब्बल ७०४ चौरस मीटरच्या जागेवर ही भूमिगत पाण्याची टाकी बनवली जाणार असून प्रती चौरस मीटरसाठी ५१ हजार ८१४ रुपये मोजले जाणार आहेत.
(हेही वाचा पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा टोला; म्हणाले…)
Join Our WhatsApp Community