कोरोना झाला, त्यातून बरे झाल्यावर नवदाम्पत्याने केली…

80

कोरोना होऊन गेल्यानंतर त्याच्या दुष्परिणामाने हैराण झालेल्या एका नवदाम्पत्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील वरळी येथे घडली. आत्महत्या करणारे दाम्पत्य मूळचे केरळ राज्यातील असून, मुंबईत मागील काही वर्षांपासून वास्तव्यास होते.

गेल्या वर्षीच झाले लग्न

अजय कुमार (३४) आणि सूझा एस (३०) असे या दाम्पत्याचे नाव आहे. अजय कुमार हा खाजगी कंपनीत नोकरी करत होता, तर सुझा ही बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर होती. गेल्या वर्षीच या दोघांचे लग्न झाले. वरळीच्या गणपतराव कदम मार्गावरील भारत मिल हौसिंग सोसायटीच्या १८व्या मजल्यावर हे दोघं जण राहत होते.

(हेही वाचाः मोबाईल रिपेअरिंगला देताय? मग सावधान… तुमच्यासोबतही होऊ शकते ‘असे’)

काय झाले नेमके?

बुधवारी दिवसभर मुलगी आणि जावई फोन उचलत नाहीत, म्हणून सुझाच्या आईने गुरुवारी केरळातून तिच्या एका मैत्रिणीला फोन करुन चिंता व्यक्त केली. गुरुवारी सुझाची मैत्रीण घरी आली असता, दरवाजा आतून बंद होता. तिने शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडले असता, सुझा आणि तिचा पती अजय कुमार हे बेडरूममध्ये निपचित पडले होते. शेजाऱ्यांनी वरळी पोलिसांना कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

काय होतं चिठ्ठीत?

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पूर्व तपासणीसाठी नायर रुग्णालय पाठवले. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली असून, त्यात अजयकुमार आणि सुझा यांनी ‘आम्हाला कोरोना झाला होता, त्यातून आम्ही बरे झालो, मात्र त्यानंतरही आम्हाला त्रास होऊ लागल्यामुळे, आम्ही आमचे जीवन समाप्त केले आहे’ असे लिहिले होते. या दोघांनीही विष घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचाः गोवंडीत दुमजली घर कोसळले, ३ ठार, ७ जखमी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.