नुकत्याच आई झालेल्या महिला एकाकी असतात तेव्हा अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्या नैराश्यात जातात. अशा वेळी जर त्या सासू-सासरे किंवा आई-वडील यांच्यासोबत राहत असतील तर त्या निरोगी राहतात, अशा प्रकारे एकत्र कुटुंब व्यवस्थेचे (Join Family) महत्व अधोरेखित करणारा अहवाल फिनलँड हेलसिंकी विद्यापीठाने दिला आहे.
४.८८ लाख मातांवर केला सर्वे
फिनलंडच्या हेलसिंकी विद्यापीठातील लोकसंख्या संशोधक डॉ. नीना मेत्सा-सिमोला म्हणाल्या, आई-वडील ७० वर्षांपेक्षा कमी वय असेल, तसेच चालते-फिरते असतील आणि त्यांना गंभीर आरोग्य समस्या नसेल तर मुलांना जन्म देणाऱ्या महिलांमध्ये नैराश्याविरोधी औषध घेण्याची शक्यता कमी असते. या अहवालानुसार, संशोधकांनी २००० ते २०१४ दरम्यान फिनलंडमध्ये ४.८८ लाख मातांवर लक्ष ठेवले. या संशोधनाच्या अंतर्गत संबंधित मातेचा कोणी साथीदार होता की नाही. यासोबत आजी-आजोबा, आई आणि वडील दोघांचे वय, आरोग्य, त्यांच्यातील अंतर याचा समावेश होता.
डॉ. मेत्सा-सिमोला म्हणाल्या, मुले असणाऱ्या कुटुंबासाठी आजी-आजोबाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कुटुंबात (Join Family) असलेल्या आजी-आजोबांचा आधार मातांना नैराश्यापासून वाचवू शकतो, विशेषतः ज्या विभक्त होतात किंवा एकल पालकत्वात प्रवेश करतात, असेही डॉ. मेत्सा-सिमोला यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community