महत्त्वाची बातमी; पोलादपूर- महाबळेश्वरला जोडणारा ‘हा’ घाट 4 जानेवारीला राहणार बंद

पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरुन प्रवास करणा-या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पार फाटा ते मेटतळे घाट दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट एक दिवस बंद राहणार आहे. रस्त्याच्या कामासाठी इथली वाहतूक बुधवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान बंद राहिल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

अतिवृष्टीने रस्त्याचे मोठे नुकसान

महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने रस्ता खराब झाला होता. रस्ते, घाट, पूल, शेती, घरे, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे तसेच, नदीपात्रातून, ओढ्यांच्या पात्रांतून मोठ्या प्रमाणात दगड- माती रस्त्यावर येऊन रस्त्याचे मोठे नुकसान झाले होते. रस्ता वाहून जाणे, पूल वाहून जाणे अशाप्रकारचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अतिवृष्टीमुळे दूरवस्था झालेल्या रस्त्याचे काम दिवसभरात पूर्ण केले जाणार आहे.

( हेही वाचा: विमा घेण्यासाठी KYC बंधनकारक; ‘या’ नियमांत झाला बदल? जाणून घ्या सविस्तर )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here