मेट्रो रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर ‘बेस्ट’ सेवा : तीन नवीन बेस्ट बसेस मार्ग शुक्रवारपासून सुरु

मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या रेल्वे स्थानकांशी संलग्न बेस्ट बसेसची सेवा सुरु करण्यात येत असून या मेट्रो रेल्वे स्थानकाच्या जवळून बस मार्ग क्रमांक ए २९५, ए २८३ आणि ए २१६ हे नवीन बस मार्ग शुक्रवारी २० जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासांना बेस्टने पुढील प्रवास करता येईल तसेच बस मार्गे मेट्रो रेल्वेचा प्रवास करता येणार आहे.

( हेही वाचा : बीकेसीमध्ये ‘महायुती’चे शक्तिप्रदर्शन; मोदींना ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी )

दहिसर पूर्व ते डी.एन.नगर या मेट्रो मार्गिका २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गिका ७चे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्त गुरुवारी पडले. या दोन्ही मेट्रो रेल्वे मार्गिकांचे लोकार्पण झाल्यानंतर मेट्रो प्रवाशांना संलग्न बस सेवांचा लाभ मिळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मेट्रो २ च्या मार्गावर ए २९५ आणि मेट्रो ७च्या मार्गावर ए २८३ व ए२१६ या बस क्रमांकाच्या सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्या आहे. या बस सेवा शुक्रवारी २० जानेवारी २०२३ पासून सुरु होत आहेत.

मेट्रा २ ए (बस क्रमांक ए २९५)

मेट्रो रेल स्थानक :

  • एक्सर स्थानक (बस मार्ग : शांती आश्रम-योगी नगर- जयराजनगर-एमएचबी पोस्ट ऑफीस),
  • बोरीवली स्थानक, (बस मार्ग चारकोप-गोराई सेक्टर १ व २- गोराई खाडी-एमएचबी वसाहत) पहाडी एक्सर स्थानक(बस मार्ग चारकोप-चारकोप मार्केट- चारकोप सेक्टर ६-महावीर नगर)

मेट्रा २ ए (बस क्रमांक ए २१६)

मेट्रो रेल स्थानक :

  • दहिसर पूर्व स्थानक (बस मार्ग: सरस्वती संकुल- आशिष संकुल- आनंद नगर),
  • मेट्रो ७ (बस मार्ग क्रमांक ए २८३)

मेटो रेल स्थानक

  • आकुली स्थानक(बस मार्ग: दामू नगर-अनिता नगर- क्रांतीनगर-गौतम नगर- महिंद्रा गेट क्रमांक ४- हनुमान नगर- नरसी पाडा- संभाजी नगर)
  • कुरार स्थानक (बस मार्ग: बाण डोंगरी- पुष्पा पार्क- कुरारगांव-पठाणवाडी)
  • दिंडोशी स्थानक (बस मार्ग: दिंडोशी आगार- ऑबेरॉय मॉल)

मेट्रो ७ (बस मार्ग क्रमांक ए २१६)

मेटो रेल स्थानक

दहिसर पूर्व स्थानक(बस मार्ग: सरस्वती संकुल-आशिष संकुल- आनंद नगर)

ओवरी पाडा स्थानक (बस मार्ग: नॉव्हेल्टी सिल्क मिल- केतकी पाडा- दहिसर चेकनाका -घरटनपाडा – गणेश नगर)

राष्ट्रीय उद्यान स्थानक (बस मार्ग: बोरीवली रेल्वे स्थानक पूर्व- श्रीकृष्णनगर -नॅन्सी वसाहत -गणेश नगर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here