Newsclick : न्यूजक्लिकचा भारताच्या नकाशाच्या विकृतीकरणाचा अजेंडा; प्रबीर पुरकायस्थ यांच्या विरोधात काय आहेत पुरावे

100
Newsclick : न्यूजक्लिकचा भारताच्या नकाशाच्या विकृतीकरणाचा अजेंडा; प्रबीर पुरकायस्थ यांच्या विरोधात काय आहेत पुरावे
Newsclick : न्यूजक्लिकचा भारताच्या नकाशाच्या विकृतीकरणाचा अजेंडा; प्रबीर पुरकायस्थ यांच्या विरोधात काय आहेत पुरावे

दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्या अटकेचे कारण सांगितले आहे. न्यूजक्लिक वृत्तसंकेतस्थळाने अरुणाचल प्रदेश आणि काश्मीर भारताचा भाग म्हणून न दाखवण्याचा आंतरराष्ट्रीय अजेंडा चालवला होता. याबाबत त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले आहेत.पोलिसांकडे प्रबीर पुरकायस्थ आणि अमेरिकन व्यावसायिक नेव्हिल रॉय सिंघम यांच्यातील ईमेल ट्रेल्स आहेत. काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश ‘विवादित क्षेत्र’ म्हणून दाखविल्या गेलेल्या भारताचा नकाशा कसा तयार करायचा यावर त्या इमेलमध्ये चर्चा केली आहे.दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक वेबसाइटचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना 3 ऑक्टोबरच्या रात्री अटक केली होती. 4 ऑक्टोबरला सकाळी त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

(हेही वाचा – Grievance Redressal Cell : शहराच्या पालकमत्र्यांना महापालिका सभागृहनेत्यांच्या दालनाची भुरळ)

न्यूजक्लिकवर विदेशी निधी घेतल्याचा आरोप आहे. न्यूजक्लिकचा देशाची एकता आणि अखंडता कमकुवत करण्याचा हेतू होता. या संकेतस्थळाने भारताच्या उत्तर सीमेशी छेडछाड केली आहे. नकाशात काश्मीर आणि अरुणाचल भारताचा भाग म्हणून दाखवले नाही. नकाशात देशाची एकता आणि प्रादेशिक अखंडता कमकुवत करण्याचा त्यांचा हेतू दर्शवतात. गौतम नवलखा हा न्यूजक्लिकमध्ये शेअरहोल्डर आहे. गौतम नवलखा यांचाही देशविरोधी कारवायांमध्ये हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित 30 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये 9 महिलांसह 46 जणांची चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये पत्रकार उर्मिलेश, अनिंद्यो चक्रवर्ती, अभिसार शर्मा, प्रंजय गुहा आणि इतिहासकार सोहेल हाश्मी यांचा समावेश आहे. सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

5 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्क टाईम्सने एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की न्यूजक्लिकला अमेरिकन अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघम यांनी वित्तपुरवठा केला होता. चिनी प्रचाराला चालना देण्यासाठी ते भारतासह जगभरातील संस्थांना निधी देतात.

या अहवालाच्या आधारे 17 ऑगस्ट रोजी न्यूजक्लिकवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. IPC चे कलम 153 (A) (धर्म किंवा वंशाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) तसेच UAPA ची अनेक कलमे (13, 16, 17, 18 आणि 22) त्यांच्याविरुद्ध लागू करण्यात आली आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.