पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे! 

या कालावधीत ३० किमी प्रति तास इतक्या वेगात वारे वाहण्याची शक्यता आहे. अशी स्थिती आठवडाभर राहणार आहे. 

69

भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस महराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा दिला आहे.

३० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील!

२९ एप्रिलपासून २ मे दरम्यान हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचे मुंबईतील हवामान खात्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले. यावेळी वादळी वारे वाहतील, वीजा चमकतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मुंबई आणि पालघर या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल वातावरण शुष्क असेल. उपग्रहावरून महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यासह अन्य भागात पावसाचे ढग जमल्याचे दिसत होते. या कालावधीत सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  यातील बीड जिल्ह्याला २ मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, उर्वरित दिवसांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत ३० किमी प्रति तास इतक्या वेगात वारे वाहण्याची शक्यता आहे. अशी स्थिती आठवडाभर राहणार आहे.

(हेही वाचा : लॉकडाऊनमुळे उपनगरीय रेल्वेला १ हजार कोटींचे नुकसान!)

बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होणार! 

सध्याच्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील फळ बागायतदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण संत्र, द्राक्ष इत्यादी फळांच्या बागांवर वादळी वाऱ्याचा परिणाम होईल, अशी शक्यता आहे. विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस काढला तरी ज्या शेतकऱ्यांनी कापूस व्यवस्थित ठेवला नसेल अथवा ज्यांचा मिलमध्ये कापूस ठेवला असेल त्यांनी तातडीने कापूस व्यवस्थित ठेवाला नाही तर त्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.