Weather Update : राज्यात ४८ तासात पावसाची शक्यता

बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. असे वातावरण पुढील ४८ तास कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

409
Weather Update : राज्यात ४८ तासात पावसाची शक्यता

राज्यात अनेक भागांत ढगाळ हवामान असून, मंगळवारी (९ जानेवारी)  मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान, बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. असे वातावरण पुढील ४८ तास कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. उत्तर भागातून थंड वाऱ्यांचा प्रभाव होत आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या हवामानाची स्थिती एकत्र येऊन सध्या महाराष्ट्रात हिवाळा आणि पावसाळा असे दोन्ही वातावरण अनुभवायला मिळत आहे. तर संपूर्ण दक्षिण भारताला येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Update)

सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पूर्वेकडून आद्रतायुक्त वारे येत आहेत. तसेच राज्याच्या दिशेने वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर ते एकत्र येऊन पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागात मंगळवारी ( ९ जानेवारी) पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.

(हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : मंदिरासाठी ‘१४ सुवर्ण जडीत’ दरवाजे होत आहेत तयार

कोकणातील रामेश्वर, कणकवली, देवगड, वैभववाडी,रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर आणि राजापूर आदी भागात हलका पाऊस पडला. मध्य महाराष्टातील पुणे, सातारा, नाशिक,जळगाव जिल्ह्यातील काही भागांत हलक्या सरी पडल्या. महाबळेश्वर मध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.