पुढील ५ दिवस पावसाचे! पूर्वमोसमी पावसाची लागणार हजेरी! 

गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे. पाऊस आणि गारपीटने अनेक ठिकाणी शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.

यंदा महाराष्ट्रात पावसाची वेळेत हजेरी लागणार आहे. तशी माहिती हवामान खात्याने याआधीच दिले आहेत. आता येत्या ५ दिवसांत राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यातील बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने येथील लेंढी नदीला अक्षरशः पूर आला आहे. तर मालेगाव शहरातही वादळी पावसाने हजेरी लावली.

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात आगामी पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेने दिला आहे. हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.  गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला आहे. पाऊस आणि गारपीटने अनेक ठिकाणी शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.

(हेही वाचा : ऑक्सिजनने मुंबईची दिल्लीपर्यंत वाढली लेव्हल!)

४० टक्के शेतीचे नुकसान!

मागील आठवडाभरात राज्यात कुठे गारपीट झाली, तर कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. गोंदिया जिल्हातील विविध तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटने शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे धान कापणीसाठी आले होते. पूर्व मोसमी पाऊस आणि गारपीट झाल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी पंचनामा करण्याकरिता आदेश दिले. त्यानुसार तलाठी व कृषी सहाय्यक यांनी नुकसान झालेल्या धान पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांचे सरासरी 40 टक्के नुकसान झाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here