कुर्ल्यातील ‘या’ विभागात पुढील दहा शनिवार पाणी पुरवठा राहणार बंद

next ten Saturdays, water supply will be off in this section of Kurla
कुर्ल्यातील 'या' विभागात पुढील दहा शनिवारी राहणार पाणी पुरवठा बंद

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या पूर्व उपनगरातील ‘एल’ विभागामधील खैरानी रोडखाली असणाऱ्या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर या दरम्यानच्या जल वाहिनीच्या सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याने व सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांची गैरसोय होवू शकत असल्याने महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने याबाबत सकारात्मक विचार करुन हे काम हे टप्प्या-टप्प्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सदर काम हे टप्प्या-टप्प्याने १० दिवसात अर्थात सलग १० शनिवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शनिवार ४ मार्च २०२३ ते शनिवार ६ मे २०२३ या कालावधीदरम्यान प्रत्येक शनिवारी ‘एल’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आझाद मार्केट या परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहिल असे जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी कळवले आहे.

‘एल’ विभागातील खैरानी रोडखाली असणाऱ्या १२०० मिलीमीटर व्यासाच्या व ८०० मीटर लांबीच्या जल वाहिनीचे सक्षमीकरण लवकरात लवकर करणे आवश्यक झाले आहे. या जल वाहिनीच्या अंतर्गत भागात ‘क्युअर्ड इन प्लेस्ड पाईप’ या पद्धतीने जल वाहिनीचे मजबुतीकरणाचे काम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी सलग १० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. मात्र, सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी व नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या हेतुने सदर काम टप्प्या-टप्प्यामध्ये १० दिवसांत करण्यात येणार आहे. यामुळे ‘एल’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आझाद मार्केट या परिसरांमध्ये शनिवार, ४ मार्चपासून ते शनिवार ६ मे २०२३ पर्यंत सलग १० शनिवार पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल. तरी या परिसरातील नागरिकांनी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून व काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर खबरदारीची उपाययोजना म्हणून दर रविवारी येणारे पाणी हे गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.

कोणत्या शनिवारच्या दिवशी असेल पाणी पुरवठा बंद?

  • ‘एल’ विभागातील ४ मार्च २०२३,
  • ११ मार्च २०२३
  • १८ मार्च २०२३
  • २५ मार्च २०२३
  • १ एप्रिल २०२३
  • ८ एप्रिल २०२३
  • १५ एप्रिल २०२३
  • २२ एप्रिल २०२३
  • २९ एप्रिल २०२३
  • ६ मे २०२३

(हेही वाचा – खोके…बोके…ओके…च्या घोषणा आल्या अंगाशी; प्रशासकांनी उद्धव गटासह इतर पक्षांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात वाढीव निधी रोखला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here