Rain : पुढील दोन दिवस पावसाचे; कुठे रेड अलर्ट, कुठे ऑरेंज

165

शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच मुंबई उपनगराला पावसाने (Rain) झोडपून काढले, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. पण पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी पावसाचे आहेत, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

शनिवारी सुरु झालेल्या पावसाचा जोर रविवारीही कायम राहणार आहे. हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्हयांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात अधिक पाऊस कोसळत होता. शनिवारी सकाळी १० ते १२ दरम्यान अधून-मधून सोसाटयाच्या वा-यासह वेगाने येणारा पाऊस (Rain) मुंबईकरांना धडकी भरवत होता. सकाळी दादर परिसरात पडलेल्या पावसाने नागरिकांना उद्योजकांना धडकी भरविली होती. वेगवान पावसाचा मारा कायम राहिला असता तर दादर आणि परिसरात पाणी साचण्याची शक्यता होती. मात्र पावसाने जोर ओसरल्याने पाण्याचा निचरा झाला.

(हेही वाचा Shri Ram यांच्या अस्तित्वाचा पुरावा उपलब्ध नाही; डीएमकेच्या मंत्र्याने गरळ ओकली)

भारतीय हवामान शास्त्र विभागाने राज्यातील काही ठिकाणांना चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकणात सतर्कता बाळगण्यात यावी, असे भारतीय हवामान शास्त्र विभाग, पुणे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर असे म्हणाले.

मुंबई कुठे किती पडला पाऊस? 

शनिवार, ३ ऑगस्ट रोजी मुंबई शहरात सायन, वडाळा येथे ५५ ते ६७ मिमी, तर पश्चिम मुंबईमध्ये सांताक्रूझ, वांद्रे आणि सांताक्रूझमध्ये ७० ते ८३ मिमी, पूर्व मुंबईत  चेंबूर, घाटकोपर येथे ७९ ते १०७ मिमी पावसाची (Rain) नोंद झाली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.