NFR Railway Recruitment: 5 हजारांहून अधिक पदांसाठी भरती; असा करा अर्ज

95

नाॅर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने ( North East Frontier Railway) अप्रेंटिस ( Apprentice) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 5 हजार 636 पदांसाठी ही भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करायची पद्धत ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. 1 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, 30 जून 2022 पर्यंत चालणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष ( 10+2 परीक्षा पद्धतीखालील) किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त मंडळातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आयटीआयची पदवी असणेही आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

ही निवड तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे होणार आहे. प्रत्येक युनिटमधील गुणवत्ता यादी त्या ट्रेडमधील मॅट्रिक गुणांमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल. ज्यात अप्रेंटिसशिप करायची आहे.

( हेही वाचा: ‘त्या’ मुलांचाही आता संपत्तीत वाटा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय )

असा करा अर्ज

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या nfr.indianrailways.gov.in
  • NFR Recruitment 2022 असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक ती माहिती भरा आणि नमूद केलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • नोंदणी फाॅर्म एकदा तपासून सबमिट करा
  • पुढील वापरासाठी अर्ज सेव्ह करुन याची प्रिंट काढा आणि तुमच्या जवळ ठेवा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.