Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या विरोधात NIA ची मोठी कारवाई

Gurpatwant Singh Pannu : एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याबद्दल एन.आय.ए.ने शिख फाॅर जस्टीस संघटनेचा (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

105
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या विरोधात NIA ची मोठी कारवाई
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या विरोधात NIA ची मोठी कारवाई

एअर इंडियाचे (air india) विमान उडवण्याची धमकी देणारा खलिस्तानवादी दहशतवादी (Khalistanist terrorists) गुरपतवंतसिंग पन्नू याच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) कारवाई केली आहे. (Gurpatwant Singh Pannu) एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याबद्दल एन.आय.ए.ने शिख फाॅर जस्टीस संघटनेचा (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 10, 13, 16, 17, 18, 18 बी, यूएपी (ए) च्या 20 आणि 120 बी, 153 ए आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Air Pollution : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील ५८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची ‘धुलाई’)

एअर इंडियाचे विमान उडवण्याची धमकी

गुरपतवंत सिंग पन्नू हा भारत सरकारने यू.ए.पी.ए. (UAPA) अंतर्गत घोषित केलेला दहशतवादी आहे. सरकारने त्याच्या शीख फॉर जस्टिस या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून त्यावरही बंदी घातली आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने 4 नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ जारी केला होता. ज्यामध्ये 19 नोव्हेंबर रोजी भारतातून आणि त्या पलीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. (Gurpatwant Singh Pannu)

दिल्ली विमानतळ बंद ठेवण्याची धमकी

या धोक्याची गंभीर दखल घेत नागरी उड्डाण सुरक्षा विभागाने (BCAS) दिल्ली आणि पंजाबहून येणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांची दुहेरी सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले होते. दहशतवादी पन्नू याने भारत सरकारला 19 नोव्हेंबर रोजी दिल्ली विमानतळ बंद ठेवण्याची धमकी दिली होती. जे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे आणि या धोक्यामुळे उड्डाणे आणि व्यापारावर मोठा फरक पडला असता.

(हेही वाचा – Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार गटावर निवडणूक आयोग नाराज; पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला)

विकासप्रकल्पांना धमक्या 

दहशतवाद्याने अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. तो शिखांना भारताविरुद्ध भडकवतो. यापूर्वी अनेक धमक्यांमध्ये त्यांनी औष्णिक ऊर्जा प्रकल्प, रेल्वे मार्ग, मेट्रोवरील हल्ले करण्याची भाषा केली आहे.

शीख फॉर जस्टिस संस्थेवर बंदी

सुरक्षा यंत्रणा पन्नूच्या धमक्या अतिशय गांभीर्याने घेत आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहेत आणि सुरक्षायंत्रणा बळकट करत आहेत. भारत सरकारने प्रथम 10 जुलै 2019 रोजी त्याच्या शीख फॉर जस्टिस या संस्थेवर बंदी घातली. 1 जुलै 2020 रोजी त्याने गुरपंतवंत सिंग पन्नू याला दहशतवादी घोषित केले आहे. (Gurpatwant Singh Pannu)

एनआयएची कारवाई

एनआयएनेही (NIA) 2019 मध्ये त्यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरच्या तपासादरम्यान सप्टेंबर 2023 मध्ये पंजाबमधील अमृतसर आणि चंदीगड येथील त्याचे घर जप्त करण्यात आले. 2021 साली न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 2022 मध्ये त्याला फरार घोषित करण्यात आले होते. (Gurpatwant Singh Pannu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.