Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

64
Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कासगंज (Kasganj Violence) येथे २६ जानेवारी २०१८ रोजी तिरंगा यात्रेदरम्यान झालेल्या दंगलीत चंदन गुप्ता (Chandan Gupta) या हिंदू युवकाची हत्या करण्यात आली होती. या बहुचर्चित प्रकरणात, लखनौच्या एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना दोषी ठरवले आहे. या सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचा – Prof. Sanjay Mandlik यांना विधान परिषदेवर संधी द्या; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी)

काय होते कासगंज दंगलीचे प्रकरण?

२६ जानेवारी २०१८ रोजी कासगंजमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP) आणि हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते तिरंगा आणि भगवे झेंडे घेऊन सुमारे १०० मोटरसायकलींवर स्वार होऊन यात्रा काढली. या यात्रेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्यकर्ते चंदन गुप्ता देखील सहभागी झाले होते. या वेळी तिरंगा यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी केलेल्या गोळीबारात चंदन गुप्ताची गोळी मारून हत्या करण्यात आली. चंदनच्या मृत्यूनंतर कासगंजमध्ये आठवडाभर तणावपूर्ण सामाजिक स्थिती होती.

एनआयएकडे सोपवण्यात आली चौकशी

चंदन गुप्ताच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आणि नंतर ती एनआयएकडे सोपवण्यात आली. एनआयएच्या तपासाअंती समोर आले की, चंदन गुप्ता या युवकाची हत्या हे एक षड्‍यंत्र होते. यात अनेक आरोपी सामील होते. या प्रकरणात एकूण २८ आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यापैकी अनेकांवर हत्या, दंगल आणि जातीय उन्माद पसरवण्याचा आरोप होता. लखनौच्या (Lucknow) एनआयए न्यायालयाने तपासाच्या आधारावर २८ आरोपींना दोषी ठरवले आहे.

एनआयएने या हत्याकांडातील २८ आरोपींना दोषी ठरवले आहे, तर दोन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. आरोपींनी उच्च न्यायालयात एनआयए न्यायालयाच्या सुनावणीवर स्थगितीची याचिका दाखल केली होती, परंतु उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आरोपींची याचिका फेटाळली होती.

ज्या 28 आरोपींना शिक्षा झाली आहे. त्यांची नावे आहेत, वसीम, नसीम, ​​जाहिद, आसिफ, अस्लम, अक्रम, तौफीक, खिल्लान, शवाब अली, राहत, सलमान, मोहसीन, आसिफ, साकीब, बबलू, झीशान, वसीफ, इमरान, शमशाद, जफर, साकीर, खालिद परवेज, फैजान, इम्रान, साकीर, आमिर रफी, मुनाजीर आणि सलीम.

यातील 26 आरोपी लखनौ कारागृहात बंद आहेत. मुनाजीर कासगंज (Kasganj Violence) तुरुंगात बंद आहे. दरम्यान, सलीमने एनआयए न्यायालयात आत्मसमर्पण केले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.