मनसुख हिरेन प्रकरणी आरोपपत्र दाखल! कुणाला बनवले आरोपी?

९ जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती.

मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपले आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये एनआयएने सचिन वाझे याच्यासह १० जणांना आरोपी केले आहे. मनसुखला मारण्यासाठी ४५ लाख रुपये देण्यात आले होतेमी असे या आरोपपत्रात म्हटले आहे.

९ जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंत १५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने चौकशीसाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे. एनआयएने मनसुख प्रकरणी दोन फोन जप्त केले आहेत. हे फोन दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद असलेल्या इंडियन मुजाहिदीनचा कथित प्रमुख तहसीन अख्तरकडून जप्त करण्यात आले आहेत. अख्तरने कबूल केले आहे की हे दोन्ही फोन त्याचे आहेत. यासंदर्भात एनआयएने न्यायालयाला सांगितले की, या फोनच्या तपासामुळे अनेक महत्त्वाचे खुलासेही होऊ शकतात, त्यामुळे आणखी काही वेळ आवश्यक आहे.

(हेही वाचा : ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकला! सर्व पक्षांचे एकमत)

आतापर्यंत यांना केली अटक

एनआयएने आतापर्यंत मनसुख प्रकरणात मुंबई पोलिसांचे बडतर्फ एपीआय सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, रियाझुद्दीन काझी आणि सुनील माने यांना अटक केली आहे. एनआयएने माजी पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांनाही अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here