एनआयएने कर्नाटकातील एका काँग्रेसच्या माजी आमदाराच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाली. त्यामध्ये माजी आमदाराच्या सूनेला यंत्रणेने अटक केली. मारीयम पूर्वाश्रमीची दीप्ती मार्ला ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी संघटना आयसीसच्या संपर्कात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माजी आमदाराच्या घरातच पोसताय दहशतवाद
कर्नाटकातील काँग्रेसचे माजी आमदार बी एम इदिनब्बा यांच्या मंगळूर येथील घरावर एनआयएने धाड टाकली. त्यावेळी एनआयएने काही कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच याप्रकरणी एनआयएचे उप अधिक्षक कृष्णकुमार यांनी मारीयम पूर्वाश्रमीची दीप्ती मार्ला हीला ताब्यात घेतले. तिला स्थानिक न्यायालायातून कोठडी देण्यात आल्यावर पुढील चौकशीसाठी दिल्ली येथे आणण्यात आले. मारीयम उर्फ दीप्ती मार्ला ही आयसिसची दहशतवादी अजमल हीच्या संपर्कात आली. अजमल ही माजी आमदार बी एम इदिनब्बा यांच्या मुलीची मुलगी आहे. अजमल काही दिवसांपूर्वी सीरियाच्या संपर्कात आली. तिथे ती आयसीसची कट्टर दहशतवादी बनली.
(हेही वाचा राजकीय नेत्यांमध्ये पसरतोय होलसेलमध्ये कोरोना! आता मंत्री एकनाथ शिंदे बाधित)
दीप्ती अशी ठरली लव जिहादची बळी
मारीयम ही हिंदू होती, ती उच्चभ्रू घराण्यातील होती. दीप्तीचे शिक्षण दुबईत झाले. तिथे तिला इस्लामचे आकर्षण झाले. त्यानंतर तिचा निकाह तिच्या गावातील अनास अब्दुल रेहमान या मुस्लिम तरुणाशी झाला. अनास हा माजी आमदार बी एम इदिनब्बा यांचा मुलगा आहे.
Join Our WhatsApp Community