राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी तमिळनाडूतील 21 ठिकाणी छापे टाकले. NIA ची टीम 2022 मधील कोईम्बतूर येथील कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Coimbatore car blast) तपास करत आहे. या प्रकरणी तपास करत असतांना NIA सर्व ठिकाणी छापे टाकण्यासाठी एकाच वेळी पोहोचली. (NIA Raid in Tamil Nadu)
(हेही वाचा – Army Guard : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ‘चेंज ओव्हर ऑफ द आर्मी गार्ड’ बटालियन सोहळा)
तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती
या प्रकरणी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (ISIS) संबंध असलेल्या या कार बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात तरुणांना कट्टरपंथी शिकवण देणे, तसेच दहशतवादी संघटनेत भरती करणे असेही गंभीर मुद्दे समोर येत आहेत. NIA या बाजूचाही तपास करत आहे. या वेळी चार जणांना अटकही करण्यात आली.
अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि वस्तू जप्त
रविवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, NIA च्या पथकाने तमिळनाडूमध्ये ISIS मध्ये भरती आणि तरुणांना कट्टरपंथी बनवण्याच्या आरोपाखाली 4 जणांना अटक केली. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकतांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. या छाप्यांमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
एनआयएच्या पथकाने 21 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 6 लॅपटॉप, 25 मोबाईल फोन, 34 सिमकार्ड, सहा एसडी कार्ड आणि तीन हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. यात आयएसआयएसशी संबंधित पुरावे आहेत. सायबर तज्ज्ञांची टीम या उपकरणांची तपासणी करत आहे. (NIA Raid in Tamil Nadu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community