बुधवारी (२३नोव्हेंबर) सकाळी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खलिस्तानी समर्थकांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील 14 ठिकाणी छापे टाकले. सकाळी सहा वाजता छापा टाकण्यात आला. एन. आय. ए. ची एक टीम गावात रवाना करण्यात आली. बटाला येथे एन. आय. ए. च्या पथकाने श्री हरगोविंदपूर येथील बोलेवाल गावात दिब्रुगढ तुरुंगात असलेल्या अमृतपाल सिंगचा सहकारी किरपाल सिंग याच्या घरावर छापा टाकला. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर या वर्षी झालेल्या हल्ल्याच्या तपासासंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (NIA Raids)
यासंदर्भात ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने ही माहिती देताना सांगितले, की १९ मार्च आणि २ जुलै रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी दोन्ही राज्यांत छापे टाकण्यात आले.वाणिज्य दूतावासात अवैध प्रवेश, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दूतावासातील अधिकाऱ्यांना इजा आणि इमारतीत जाळपोळीसारख्या गुन्ह्यांसंदर्भात ही यंत्रणा तपास करत आहे. ‘एनआयए’ने पंजाबमधील मोगा, जालंधर, लुधियाना, गुरुदासपूर, मोहाली आणि पतियाळा येथे तर हरियाणातील कुरुक्षेत्र आणि यमुनानगर जिल्ह्यात छापे टाकले. तसेच ‘डिजिटल डेटा’ जप्त करण्यात आला. या शिवाय अन्य आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. (NIA Raids)
(हेही वाचा : Mithi River Project : मिठी नदी प्रकल्प: पवईतील मोरारजी नगर मधील १६६ बांधकामे हटवली)
‘एनआयए’चे काय आहे मत
वाणिज्य दूतावासावर हल्ला करणाऱ्यांवर खटला चालववून अशा भारतविरोधी घटकांवर कठोर कारवाईचा संबंधितांना योग्य संदेश देण्यासाठी ‘एनआयए’ या प्रकरणाचा तपास करत आहे. ‘एनआयए’च्या पथकाने ऑगस्ट २०२३ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोला भेट देऊन वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यांच्या घटनांची चौकशी केली होती. या वर्षी २ जुलै रोजी सॅनफ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. फुटीरतावादी ‘खलिस्तान टायगर फोर्स’चे प्रमुख हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर हा हल्ला झाला. याआधी १९ मार्च रोजी खलिस्तान समर्थक आंदोलकांच्या एका गटाने वाणिज्य दूतावासावर हल्ला करून त्याची तोडफोड केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community