सीएसएमटीजवळ केनियन तरुणाचा 8 जणांवर चाकू हल्ला

129

मुंबई उच्च न्यायालयाच्या जवळच जॉन चुदास मेन्टी या केनियन तरुणाने अचानकपणे चाकूने हल्ला करून एकूण आठ व्यक्तींना जखमी केले. त्यातील ४ जखमींना जी.टी रुग्णालयात, तर ४ व्यक्ती जे.जे रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे मुंबई पोलीस हादरून गेले आहेत. पोलिसांनी त्या नायजेरीयन   तरुणाला अटक केली आहे.

जखमींना जीटी रुग्णालयात दाखल 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार नायजेरीयन तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केले होते, त्यामुळे त्याच्यावर अमली पदार्थांचा अंमल झाला होता. त्या नशेतून त्याने चाकू हल्ला केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या परिसरात ही घटना घडली. बुधवारी, १ जून २०२२ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एका नायजेरीयन तरुणाने चाकूने हल्ला केला. हा तरुण नशेबाज होता. नशेत असताना त्याने १५ जणांवर चाकूने हल्ला केला. रस्त्यावर समोर येईल त्याच्यावर तो चाकू हल्ला करत चालला होता. या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना जीटी रुग्णालयात दाखल केले आहे.

(हेही वाचा अनिल परबांच्या रिसॉर्टवर काय कारवाई केली? केंद्रीय पर्यावरण विभागाचे राज्य सरकारला पत्र)

पोलिसावरही केला हल्ला 

उच्च न्यायालयाच्या मागे असलेल्या उद्यानाबाहेर बसलेल्या लोकांवर त्याने अचानक हल्ला केला. नायजेरीयन तरुणाच्या हातात चाकू होता. समोर येईल त्याच्यावर तो चाकूने हल्ला करत होता. रस्त्याच्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हा तरुण हल्ला करत होता. काही तरुण ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होते. पण त्याने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. तिथे पोलिसांची व्हॅन आली, त्यानंतरही त्याने एका पोलिसावर चाकूने हल्ला केला. लोकांनी त्याला पकडले आणि बेदम चोप दिला. अतिरिक्त पोलिसांनी धाव घेतली आणि त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

जी.टी रुग्णालयातील जखमींची नावे

सतीश (27)
शामराव कोमल
खान (35 गंभीर दुखापत)
अमिन बेंझामिन लोंढे (63)

जे.जे रुग्णालयातील जखमींची नावे

संदीप काशिनाथ जाधव (36)
रोहन जोसेफ
राजु परदेशी
हरीलाल रामकुमार

आरोपी नाव जॉन चुदास मेन्टी, देश-केनिया यांस पोलिसांनी ताब्यात घेतला असून जे.जे रुग्णालय येथे घेवून गेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.