शनिवारी रात्री लोकलने प्रवास करणार असाल तर ही घ्या काळजी

रोड क्रेनचा वापर करून कुर्ला प्लॅटफॉर्मवर ८.० मीटर रुंद पाच प्लेट गर्डर टाकण्यासाठी डाऊन धिम्या मार्गावर रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी दिनांक ११ व १२ च्या मध्यरात्री मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि विद्याविहार दरम्यानच्या पायाभूत कामासाठी रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे ही वेळ टाळूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.

( हेही वाचा : पाऊस आला रेल्वे थांबली…मध्य रेल्वे विस्कळीत)

या तारखेला आणि या वेळेत घेतला जाईल ब्लॉक

ब्लॉकची तारीख: ११ व १२ जून २०२२ (शनिवार/रविवार मध्यरात्री)
ब्लॉकचा कालावधी- ००.४० ते ०४.४०

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांवर कसा होईल परिणाम:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१४ ते ००.२८ पर्यंत सुटणारी डाउन मार्गावरील सेवा आणि दादर येथून ००.२९ वाजता ठाण्याकडे जाणारी डाउन सेवा माटुंगा ते विद्याविहार दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल.

अशाप्रकारे होणार लोकल रद्द
-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.०४ वाजताची कल्याण लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.०० वाजताची ठाणे लोकल कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येतील.

-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजताची कुर्ला लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला वातानुकूलित लोकल रद्द राहतील.

अप उपनगरीय उपनगरीय गाड्या

– कल्याण येथून २२.२६ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल आणि कल्याण येथून २२.५६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता वातानुकूलित लोकल कुर्ला पर्यंत चालविण्यात येतील.

-कल्याण येथून २३.४७ वाजता ची ठाणे लोकल रद्द राहील.

-ब्लॉक कालावधीत विद्याविहार स्टेशनवर डाउन उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here