महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ईएसआयसी रुग्णालयांची (ESIC Hospitals) कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. नवी दिल्ली (New Delhi) येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईएसआयसीच्या (ESIC) बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. (ESIC Hospitals)
महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या (ESIC Hospitals) खाटा शंभरवरून एकशे वीसवर नेण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार (State-of-the-art treatment) एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. (ESIC Hospitals)
(हेही वाचा – Javed Miandad पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद नजरकैदेत; काय आहेत Dawood Ibrahim शी संबंध)
खाटांची संख्या ७५ वरून दीडशेवर
कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजूरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे, तर, ओडिशातील राऊरकेलामधल्या रुग्णालयात खाटांची संख्या ७५ वरून दीडशेवर नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (ESIC Hospitals)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community