GI Tag Certification :राज्याला नऊ भौगोलिक मानांकने; तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी,कास्तीच्या कोथिंबिरीचा समावेश

महाराष्ट्राची संस्कृती, परंपरांचा वारसा उलगडणाऱ्या वस्तूंसह; तसेच इथल्या मातीत पिकणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक वाणांच्या एकूण अठरा प्रस्तावांना जीआय टॅग प्रमाणपत्र (GI Tag Certification) (जिओग्राफिकल इंडिकेशन सटिर्फिकेट) म्हणजेच भौगोलिक मानांकनामध्ये समावेश करण्यात आला आहे.

607
GI Tag Certification :राज्याला नऊ भौगोलिक मानांकने; तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी,कास्तीच्या कोथिंबिरीचा समावेश
GI Tag Certification :राज्याला नऊ भौगोलिक मानांकने; तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी,कास्तीच्या कोथिंबिरीचा समावेश

बदलापूर, बाहडोळीची जांभळे, पेणच्या गणेशमूर्ती, लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरी… महाराष्ट्राची संस्कृती, परंपरांचा वारसा उलगडणाऱ्या वस्तूंसह; तसेच इथल्या मातीत पिकणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक वाणांच्या एकूण अठरा प्रस्तावांना जीआय टॅग प्रमाणपत्र (GI Tag Certification) (जिओग्राफिकल इंडिकेशन सटिर्फिकेट) म्हणजेच भौगोलिक मानांकनामध्ये समावेश करण्यात आला आहे. (GI Tag Certification)

कास्तीची कोथिंबीर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कास्ती भागातील कोथिंबिरीला एक प्रकारचा वेगळा सुगंध आहे. बासमती तांदूळ जसा असतो तसेच या कोथिंबिरीला वेगळा वास आहे. मुंबई, नागपूर या मोठय़ा शहरांसह अन्य देशातही कोथिंबीर निर्यातही करण्यात येते.(Coriender)

बोरसुरी डाळ : निलंगा तालुक्यात बोरसुरी हे गाव आहे. येथील वरण प्रसिद्ध आहे. या भागात बोरसुरी वरणाची मेजवानी करण्यात येते. त्याला डाळ असे संबोधले जात असले तरी या गावातील वरणात टाकल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे याला नामांकन मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. (Pulses)

पानचिंचोली चिंच : पानचिंचोली या गावातील चिंचेचा आकार सहा ते आठ इंचांपर्यंत असतो. गेल्या ३०० वर्षांपासून या गावातील चिंच प्रसिद्ध आहे. या वेळी त्याची वैशिष्टय़े मांडण्यात आली. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी या कामासाठी विशेष लक्ष घातले होते.(tamrind )

(हेही वाचा : Lalit Patil Drug Case : ससूनचे माजी डीन संजीव ठाकूरांच्या मुलाचाही राजीनामा)

कुंथलगिरीचा खवा : धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. कुंथल या शब्दाचा अर्थ कुरळा असा होतो. हा भाग डोंगराळ आणि कुरळय़ा केसाच्या आकाराचा असल्याने येथे जनावरांची संख्या अधिक आहे. (Khava)

तुळजापूरची कवडी : तुळजापूरला येणारे भाविक कवडय़ांची माळ घालतात. कवडी स्त्री देवतांचे उपासक आवर्जून वापरतात. शिवाजी महाराज हे गळय़ात कवडय़ांची माळ घालत.(Tuljapur)

जालन्याची ज्वारी : ही ज्वारी टणक असून, पक्ष्यांना सहजपणे फोडता येत नाही. या भागातील ज्वारी वैशिष्टय़पूर्ण आहे. ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी पुणे येथील गणेश हिंगमिरे जीआय नामांकन क्षेत्रात काम करतात.(Jowar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.