Nirmala Sitharaman: गुगल प्ले स्टोअरवरून २,५०० अॅप्स काढून टाकले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती; कारण वाचा सविस्तर…

यापूर्वी भारत सरकारने चीनशी संबंध असलेल्या अशा २३० हून अधिक लोन अॅप्सवर बंदी घातली होती.

181
Nirmala Sitharaman: गुगल प्ले स्टोअरवरून २,५०० अॅप्स काढून टाकले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती; कारण वाचा सविस्तर...
Nirmala Sitharaman: गुगल प्ले स्टोअरवरून २,५०० अॅप्स काढून टाकले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती; कारण वाचा सविस्तर...

गुगलने एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान प्ले स्टोअरवरून २,५०० हून अधिक फसवे लोन अॅप्स काढून टाकले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली

आपल्या उत्तरात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, फसव्या कर्ज अॅप्सचे नियमन करण्यासाठी सरकार भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि इतर नियामक आणि संबंधित भागधारकांसोबत सातत्याने काम करत आहे. यापूर्वी भारत सरकारने चीनशी संबंध असलेल्या अशा २३० हून अधिक लोन अॅप्सवर बंदी घातली होती. फसवणूक, धमकावणे आणि छळवणुकीच्या तक्रारींनंतर बंदी घालण्यात आलेले हे सर्व कर्ज आणि सट्टेबाजीचे अॅप्स होते.

(हेही वाचा  – Gyanvapi Masjid Case : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का)

तज्ज्ञांचा दावा…
त्यांनी पुढे सांगितले की, एप्रिल महिन्यात गुगलने भारतात ३,५०० हून जास्त अॅप रिमूव्ह करण्यात आले आहेत. हे अॅप्सना प्ले स्टोअरच्या नियमांचे (पॉलिसी) उल्लंघन केल्यामुळे प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत. याबाबत तंत्रज्ञानातील तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, कंपनीने गुगल प्लेवर ज्यामुळे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होईल अशा प्रकारच्या १.४३ मिलियन अॅप्सना बंदी घातली आहे. भारत सरकारने या अॅप्सना आयटीएक्टच्या सेक्शन ६९ अंतर्गत बॅन केले आहे. यामध्ये १३८ बेटिंग आणि ९४ लोन लेंडिंग अॅप्सचासुद्धा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.