‘रोजा’ सोडण्यासाठी विधानभवनासमोरच्या पदपथाचा वापर; मंत्री Nitesh Rane यांच्या निर्देशानंतर कारवाईला वेग

111
'रोजा' सोडण्यासाठी विधानभवनासमोरच्या पदपथाचा वापर; मंत्री Nitesh Rane यांच्या निर्देशानंतर कारवाईला वेग
'रोजा' सोडण्यासाठी विधानभवनासमोरच्या पदपथाचा वापर; मंत्री Nitesh Rane यांच्या निर्देशानंतर कारवाईला वेग

महाराष्ट्र विधानभवनासमोरचा पदपथ अखेर ‘इफ्तार’मुक्त झाला आहे. नरिमन पॉईंट (Nariman Point) परिसरातील विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु असताना, तेथील पदपथाचा वापर रोजा सोडण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात माध्यमात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार तथा मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दखल घेत पोलीस उपायुक्तांना कारवाईचे आदेश दिले. दरम्यान दि. १२ मार्च रोजी हा परिसर ‘इफ्तार’मुक्त झाला आहे.

( हेही वाचा : धुळवडीच्या दिवशी Pune Metro ‘या’ काळासाठी राहणार बंद 

विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या डॉ. उषा मेहता चौकात (Dr. Usha Mehta Chowk) येस बँकेच्या बाजूला असलेला पादचारी मार्ग रमजान चालू झाल्यापासून नियमित सायंकाळी रोजा सोडवण्यासाठी अडवला जात आहे. नियमित सायंकाळी ६ वाजण्याच्या वेळेत या पादचारी मार्गावरच फलाहार ठेवून तेथे बैठका अंथरून रोजा सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. जवळपास ३०-३५ जणांचा जमाव त्यात सहभागी होतो आणि एक तासाहून अधिक काळ हा पादचारी मार्ग पूर्णपणे बंद ठेवला जातो.त्यामुळे पादचारी आणि तेथील छोटे मोठे व्यावसायिक यांना अडचण येत असल्याचे कळते.

याप्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की विधान भवनासमोरचा (Legislative Assembly) रस्ता अडवून इफ्तार करणे ही बाब अतिशय गंभीर आहे. मी त्याबाबत परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्तांशी बोललो आहे. एकाला परवानगी दिली, तर उद्या दुसरे कोणीतरी येऊन बसतील. त्यामुळे हा पदपथ तत्काळ मुक्त करावा, असे निर्देश मी त्यांना दिले आहेत. यापुढे तेथे रोजा सोडण्यासारखे प्रकार दिसणार नाहीत, असेही राणे (Nitesh Rane) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.