कोकणात जाणा-यांसाठी राणे सोडणार फुकट ट्रेन

गावी जाणाऱ्या कोकणातील जनतेसाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर दिली आहे भाजपा आमदार नितेश राणे यांनी.

82

काय करु गावाक जावचा हा, पण रेल्वेचा तिकीटंच गावना नाय… मुंबईत रवणाऱ्या कोकणातल्या बऱ्याच जणांच्या तोंडात सध्या ह्या एकच वाक्य ऐकाक गावता. खासगी बसचा तिकीट पण परवडना नाय, असे देखील अनेक जण म्हणतात. पण गणपतीला गावी जाणाऱ्या कोकणातील जनतेसाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर दिली आहे भाजपा आमदार नितेश राणे यांनी. मागील 9 वर्षांपासून नितेश राणे हे गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 100 रुपयांमध्ये बस सोडतात. मात्र यावेळी त्यांनी चाकरमान्यांसाठी ट्रेन सोडली आहे, तिही विना तिकीट.

मोदी एक्स्प्रेसने करा प्रवास

भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 7 सप्टेंबर रोजी रेल्वे सोडली असून, मोदी एक्स्प्रेस असे या ट्रेनचे नाव असणार आहे. 1800 जणांना या बसमधून जाता येणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेनने जाणाऱ्यांना मोफत प्रवास मिळणारच आहे, पण प्रवासादरम्यान जेवणापासून ते सर्व काळजी देखील घेतली जाणार असल्याचे नितेश राणे म्हणाले. नरेंद्र मोदींचे आभार मानण्यासाठी आम्ही ही मोदी एक्स्प्रेस सोडणार आहोत, असे देखील नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचाः आता यशोमती ठाकूर अजित दादांवर नाराज)

काय म्हणाले नितेश राणे?

गेल्या 9 वर्षांपासून मी गणपतीला बसेस सोडतो, 100 रुपयामंध्ये मी बस सोडतो. कोकणवासीयांसाठी गणपती हा खूप मोठा सण आहे. चाकरमानी कितीही व्यस्त असला, तरी सर्व बाजूला सारुन तो गणपतीत आपल्या गावाकडे वळतो. यावर्षी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी यावेळी बस न सोडता पूर्ण ट्रेन सोडणार आहे. मोदी एक्स्प्रेस या नावाची ट्रेन यावर्षी कोकणातल्या आणि विशेषत: सिंधुदुर्गातल्या चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाणार आहे. 1800 जणांना ही ट्रेन सिंधुदुर्गकडे घेऊन जाणार आहे. ही ट्रेन 7 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता दादर स्टेशनवरुन प्लॅटफॉर्म नंबर 8 वरुन सोडणार आहोत. हा पूर्ण प्रवास विनामूल्य असेल. या पूर्ण प्रवासामध्ये आम्ही जेवण देखील देणार आहोत, असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

असे करा बुकिंग

या ट्रेनचे बुकिंग कसे करायचे, याची माहिती देखील नितेश राणेंनी दिली आहे. नितेश राणेंनी या ट्रेनच्या बुकिंगची जबाबदारी, मंडळ अध्यक्ष, तालुकाध्यक्षांकडे दिली आहे. 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत या सर्वांशी संपर्क साधून आपले तिकिट बुक करावे लागणार आहे. ही ट्रेन सावंतवाडी पर्यंत असून, वैभववाडी आणि कणकवली असे दोन स्टॉप देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः जे काँग्रेसला १२ वर्षांत समजले नाही, ते भाजपाला दीड वर्षांत समजले! नितेश राणेंचा टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.