यंदाच्या नवरात्रोत्सवात दांडीया आणि गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत. आयोजकांनी या खेळात सहभागी होणाऱ्यांना आधारकार्ड तपासून प्रवेश द्यावा.
यावेळी लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने आयोजकांनी काळजी घ्यावी. ही सकल हिंदू समाजाची मागणी असल्याची भूमिका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी मंडली.
(हेही वाचा – World Cup 2023 : आज कोण बाजी मारणार? भारत -अफगाणिस्तान सामना दिल्लीत खेळवला जाणार)
गरब्यातील अन्य धर्मियांचा प्रवेशाचा मुद्दा त्यांनी समाजमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. सकल हिंदू समाजाने गरबा आयोजकांकडे केवळ हिंदूनाच प्रवेश देण्याची मागणी केली आहे. या उत्सवकाळात भगवे कपडे घालून, भगवी शाल किंवा भगवी टोपी घालूनही लोकं येतात. यावेळी खोटे बोलून फसवणूक केली जाते. लव्ह जिहादची प्रकरणे घडवली जातात. त्यामुळे आयोजकांनी गेटवरच आधारकार्ड तपासून गरब्यासाठी प्रवेश द्यावा, अशी हिंदू समाजाची मागणी असल्याचे त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Join Our WhatsApp Community