Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर; आरोपींना दिलासा मिळाला का ?

122
Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर; आरोपींना दिलासा मिळाला का ?
Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर; आरोपींना दिलासा मिळाला का ?

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. (Nitin Desai Death) याबाबत आज सुनावणी होणार होती. सुनावणीसाठी देसाई कुटुंबीय कोर्टात हजर होते. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी एडलवाईस फायनान्सच्या ५ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. ‘हे गुन्हे रद्द करा’, अशी याचिका ईसीएलचे अध्यक्ष रशेश शाह, सीईओ राजकुमार बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांनी केली होती. नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कोणताही अंतरिम दिलासा किंवा अटकेपासून संरक्षण न देता ही सुनावणी आता १३ ऑक्टोबरपर्यंत तहकूब झाली आहे.

(हेही वाचा – Overseas Debt : भारतावरील विदेशी कर्जात वाढ, रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी जाहीर)

नितीन देसाई यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आणि ईसीएलचा निकाल त्यांच्या विरोधात लागल्यामुळे आत्महत्या केली. त्यामुळे या सर्वांविरोधात नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावे, यासाठी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nitin Desai Death)

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील याचिकेवर २९ सप्टेंबरला सुनावणी होती; पण गणपती विसर्जनामुळे खालापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी कोर्टात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सरकारी वकिलांनी यासंदर्भात वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे आजची सुनावणी १३ ऑक्टोबरपर्यंत तहकूब झाली आहे. (Nitin Desai Death)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.