Nitin Gadkari Biopic : चित्रपटामुळे गडकरींचे व्यक्तीमत्व उलगडेल – देवेंद्र फडणवीस

गडकरींवरील बायोपीकच्या टिझरचे प्रकाशन

213
Nitin Gadkari Biopic : चित्रपटामुळे गडकरींचे व्यक्तीमत्व उलगडेल - देवेंद्र फडणवीस

नितीन गडकरी (Nitin Gadkari Biopic) यांच्या बहुविध क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना देशाने स्विकारले आहे. गडकरी हे इनोव्हेटर असून त्यांच्या रस्ते निर्मितीच्या कामगिरीमुळे रोडकरी म्हणूनही ओळखले जातात. ‘गडकरी’ या चित्रपटामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोहचतील तसेच त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात व्यक्त केला.

स्थानिक डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या बायोपिकच्या टिझरचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, विकास कुंभारे, भारतीय क्रिकेट संघातील आघाडिचा गोलंदाज उमेश यादव तसेच चित्रपटाचे (Nitin Gadkari Biopic) निर्माते अभिजीत मुजुमदार उपस्थित होते.

(हेही वाचा – LinkedIn Job Cuts : लिंक्ड-इन कंपनीतून आणखी ७०० जणांची कर्मचारी कपात )

नितीन गडकरी यांच्यावरील बायोपीकचे (Nitin Gadkari Biopic) प्रकाशन प्रसंगी मुख्य भूमिकेत असलेले राहुल चोप्रा व चित्रपटातील सहकलाकार आदींची उपस्थिती लक्षवेधक ठरली. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिपप्रज्वलीत करुन टिझरचे प्रकाशन केले. हा चित्रपट आगामी २७ ऑक्टोबर पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शीत होणार आहे. गडकरी यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे तीन तासात दाखविण्याचे कठीण काम या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी लिलया पार पाडले आहे. चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर त्यांच्या कार्याच्या आढावा घेणारा गडकरी-2 हा चित्रपट सुद्धा प्रदर्शीत करण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर राहणार आहे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

गडकरींमधील (Nitin Gadkari Biopic) कामाचा झपाटा आणि ते पूर्ण करण्यासाठी असलेली क्षमता प्रत्येकाने आत्मसाद करावी असे सांगतांना फडणवीस म्हणाले की, गडकरी हे प्रसिद्ध अभिनेता राज कपूर सारखे आहेत. ते छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण करतात आणि त्याशिवाय थांबत नाहीत. मुंबई-पुणे एक्प्रेस हायवे पूर्ण करण्याचे त्यांचे कार्य जगा समोर आदर्श म्हणून बघितले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत असतांनाच पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा रोड मॅप तयार करण्याची जबाबदारी गडकरी यांच्यावर सोपविल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.