Nitin Gadkari : अपघाती मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करणार; नितीन गडकरी यांची ग्वाही

'रस्ते सुरक्षेचे ४ई' अर्थात -अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहन अभियांत्रिकी)- अंमलबजावणी- शिक्षण आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच सामाजिक वर्तनात बदल करणे खूप महत्वाचे आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

186
Nitin Gadkari : अपघाती मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करणार; नितीन गडकरी यांची ग्वाही
Nitin Gadkari : अपघाती मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करणार; नितीन गडकरी यांची ग्वाही

सुरक्षित रस्ते हे सरकारचे प्राधान्य आहे. तसेच आगामी २०३० पर्यंत देशातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी (१६ जानेवारी) केले. “रस्ते सुरक्षा-भारतीय रोड्स@२०३०-सुरक्षेचा स्तर उंचावणे” या विषयावरील सीआयआय राष्ट्रीय परिषदेत ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Nitin Gadkari)

‘रस्ते सुरक्षेचे ४ई’ अर्थात -अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहन अभियांत्रिकी)- अंमलबजावणी- शिक्षण आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच सामाजिक वर्तनात बदल करणे खूप महत्वाचे आहे, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी सर्व संबंधित घटकांच्या सहकार्यावर त्यांनी भर दिला. रस्ते अपघात २०२२ च्या ताज्या अहवालानुसार ४ लाख ६० हजार रस्ते अपघात, त्यात १ लाख ६८ हजार मृत्यू आणि ४ लाख गंभीर जखमी झाले आहेत. देशात दर तासाला ५३ रस्ते अपघात होतात तर १९ मृत्यू होतात असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Shankaracharya : अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेली देशातील चार शंकराचार्यांची पीठे कोणती आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये?)

रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये १० टक्क्यांनी वाढ

रस्ते अपघातांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, परिणामी जीडीपीमध्ये ३.१४ टक्के सामाजिक-आर्थिक नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. अपघाती मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यू हे १८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांचे झाले आहेत. अपघाती मृत्यू म्हणजे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे नुकसान, नियोक्त्याचे व्यावसायिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेचे एकूण नुकसान असल्याचे गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. (Nitin Gadkari)

नागरीकांमधील चांगल्या वाहतूक वर्तनासाठी पुरस्कार प्रणालीचे नागपूरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. वाहनचालकांची नियमित नेत्र तपासणी करावी यावर त्यांनी भर दिला. संस्थांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून त्यासाठी मोफत शिबिरे आयोजित करावीत असेही सांगितले. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण आणि जागरूकता, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट-अप्स, तंत्रज्ञान पुरवठादार, आयआयटी, विद्यापीठे, वाहतूक आणि महामार्ग प्राधिकरणांशी सहकार्य हा रस्ते सुरक्षेसाठी चांगल्या पद्धतींचा प्रसार करण्याचा मार्ग असल्याचे गडकरी (Nitin Gadkari) म्हणालेत. (Nitin Gadkari)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.